Press "Enter" to skip to content

मांजरामुळे शेजार्याला मारहाण

रेवदंडा आगारआळी येथे मांजरांना खायला घालण्यास नकार दिला म्हणून शेजार्याला केली मारहाण

सिटी बेल | अलिबाग | अमूलकुमार जैन |

अलिबाग तालुक्यातील रेवदंडा ग्रामपंचायत हद्दीतील आगार आळी येथे मांजरांना ओटीवर येऊन खायला घालण्यास नकार असता तीन आरोपी यांनी मारहाण केली .या प्रकरणी महेंद्र बाळाराम खैरे (रा.रेवदंडा अगरआळी, अलिबाग) यांनी रेवदंडा पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.

रेवदंडा पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 11/10/2021 रोजी 09:15 वा ते दि.12/10/2021 रोजी 09:15 वा च्या दरम्यान फिर्यादी रा.रेवदंडा अगरआळी, अलिबाग हे घरात जेवण बनवित असताना हे बाहेर ओटीवर येवून आरोपीत नं.02 रेवदंडा अगरआळी, ता.अलिबाग यांना तू मांजरीना खायला घालू नकोस त्या माझ्या घरात सकाळ संध्याकाळ घाण करतात असे म्हटले असता सदर गोष्टीचा राग येवून आरोपीत नं.01 यांने घरात येवून पाठिमागून लाकडी दांडक्याने फिर्यादी यांचे पाठीवर व डोक्यात झोड टाकून आरोपीत नं.02 व 03 यांनी हाताबुक्याने व लाथेन मारहाण केली व बाहेर आणून तिघांनी पुन्हा हातबुक्याने व लाथेन मारले व आरोपीत नं.02 यांने विटेचा तुकडा घेवून फिर्यादी यांचे मानेवर मारला.

याबाबत रेवदंडा पोलीस ठाणे येथे गु.र.नं.119/2021 भा.दं.वि.क.452,452,324,323,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस हवालदार भोनकर हे करीत आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.