50 हुन अधिक शिवप्रेमींनी
दुरुस्तीसाठीचे सामान गडावर पोहचविले
सिटी बेल लाइव्ह / पाली /बेणसे.(धम्मशिल सावंत)
निसर्ग चक्रीवादळामुळे सुधागड तालुक्यातील किल्ले सुधागड येथील श्री.भोराई मंदिर, पंतसचिव वाडा, ऐतिहासिक वास्तू व इतर मंदिरांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भोराई देवस्थान किल्ले सुधागड, सुधागड वासीयांसह इतर संघटना व शिवप्रेमींच्या वतीने वास्तूंच्या दुरुस्तीची कामे सुरू आहेत. किल्ल्यावरील मंदिराच्या व इतर वस्तूंच्या दुरुस्तीचे सामान किल्यावर नेण्यासाठी मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. या मोहिमेत 50 हुन अधिक शिवप्रेमींनी सहभाग घेऊन मोहीम फत्ते केली.
सुधागड किल्ल्यावर चढणे म्हणजे मोठी कसरत, त्यात वजनदार साहित्य गडावर नेणें म्हणजे मोठे आव्हानच. हे आव्हान स्वीकारून आपल्या ऐतिहासिक वास्तू, मंदिरे यांचे जतन व संवर्धन करण्याच्या भावनेने मावळ्यांनी राबविलेली मोहीम सर्वांसाठी आदर्शवत व प्रेरक ठरली.
विकास चित्ते यांनी या अभुतपूर्व मोहीमेची थोडक्यात माहीती दिली. त्यानंतर पाली सुधागड तहसीलदार दिलीप रायन्नावार यांनी मोहिमेचा शुभारंभ करून जमलेल्या दुर्ग व शिवप्रेमींनी मार्गदर्शन केले. भोराई देवस्थान किल्ले सुधागड ट्रस्टच्या वतीने सुजित बारस्कर यांनी जिल्हा परिषद सदस्य सुरेश खैरे यांच्यातर्फे मोहिमेस शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले. पालीतील पटेल यांनी हे साहित्य पुरविले आहे. मोहिमेसाठी जमलेल्या सर्व दुर्गप्रेमींमध्ये मोठा उत्साह आणि जोश संचारला होता. बा रायगड परिवाराचे दत्तात्रेय सावंत, रोशन बेलोसे रोहीत देशमुख आदींसह 50 हुन अधिक स्थानिक ग्रामस्थ, दुर्गप्रेमी व शिवप्रेमी या मोहिमेस उपस्थित होते. त्यांनी किल्ल्याच्या वास्तूंच्या दुरुस्तीचे अवजड समान मोठ्या परिश्रमाने किल्यावर नेले.






Be First to Comment