सिटी बेल लाइव्ह / खांब-रोहे (नंदकुमार मरवडे)
शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना धाटाव विभाग आयोजित रक्तदान शिबिराला कोरोनाच्या काळातही नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.
रोहे शिवसेनेतंर्गत धाटाव विभाग शिवसेनेच्या वतीने शिवसेना प्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी अभिनव उपक्रम राबविले जातात. परंतू या वर्षी सर्वत्र कोरोना महामारीने थैमान घातले असल्याने सामाजिक बांधिलकीचे ध्यान राखित केवल रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित शिवसैनिक व रक्तदाते यांनी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून या उपक्रमास चांगला प्रतिसाद दर्शवून 35 बॉटल रक्त संकलित केले.
शिवसेना तालुकाप्रमुख समीर शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या या शिबिर प्रसंगी निलेश वारंगे, नितीन वारंगे, सागर भगत, रुपेश साळुंखे, राजेश भगत, सागर भगत, अक्षय देशमुख, सतीश वारंगे, समीर वारंगे, किरण भगत, श्रीकांत जंगम, महेश खांडेकर आदी उपस्थित होते.






Be First to Comment