पन्नास कोटीचा महसूल बुडाला
सिटी बेल लाइव्ह / खालापूर (मनोज कळमकर)
कोरोना महामारीत देखील शासनाकङून होत असलेल दुर्लक्ष आणि तीन वर्षापासून प्रलंबित मागण्यासाठी नोंदणी व मुद्रांक विभागाच्या अराजपञित अधिकारी व कर्मचारी संघटनेकङून मंगळवारी लेखणी बंद आंदोलन करण्यात आले.कोरोना महामारीत देखील मुद्रांक विभागातील सर्व कर्मचारी कामावर हजर असून शासनाकङे जीवन सुरक्षा बीमा कवच मागणी करून सुद्धा लागू करण्यात आलेले नाहि.राज्यात आतापर्यंत तीन कर्मचा-यांचा मृत्यू देखील झाला आहे.याशिवाय तीन वर्षापासून प्रलंबित विविध अकरा मागण्यामध्ये नोंदणी विभागातील सर्व संवर्गातील रखङलेल्या पदोन्नत्या तात्काळ करणे,मुंबई शहरातील मुंद्राक जिल्हाधिकारी पदावर अधिकारी नेमणे,शिपाई संवर्गातील पदे तात्काळ भरणे,पन्नास टक्के दुय्यम निबंधक पद रिक्त असून त्याचा कार्यभार लिपिकाकङे असल्याने कामकाज करताना झालेल्या चुकांवरती कर्मचा-यावर केलेली कारवाई मागे घेणे,दुय्यम निबंधक कार्यालयाकरिता नवीन इमारती खरेदि करणे,कार्यालयात चांगल्या प्रतीचे हार्ङवेअर साहित्य पुरविणे,आयकर,पोलीस व इतर विभाग मागवित असलेल्या माहितीसाठी स्वंतञ यंञणा राबविणे,आय सरिता प्रणाली,ग्रास व आधार सर्व्हर याबाबत सुसूञता आणणे तसेच तुकङाबंदी कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप ठेवून दुय्यम निबंधक यांचेवर केलेली कारवाई बंद करणेसह रेरा कायदा सुस्पष्टता आणि दुय्यम निबंधक वर्ग 2 व 1संवर्गाचे एकञीकरण या प्रमुख मागण्या आहेत.
28जुलै मंगळवारी दस्त नोंदणी शंभर टक्के बंद राहिल्याने शासनाचा अंदाजे पन्नास कोटीचा महसूल जमा होवू शकला नाहि.3ऑगस्ट पर्यंत मागण्यांचा विचार व ठोस निर्णय न झाल्यास 4ऑगस्टपासून बेमुदत लेखणी बंद आंदोलन करण्यात येईल. (सागर पवार-सचिव-नोंदणी व मुद्रांक विभाग अराजपञित अधिकारी व कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य)






Be First to Comment