विरजोलीत भांडणात जखमी झालेल्या रुग्णांवर उपचार
सिटी बेल लाइव्ह / नागोठणे (महेश पवार) :
रोहा तालुक्यात सध्या कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कोरोनाच्या या जागतिक महामारीच्या काळात रोहा येथील उपजिल्हा रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत. याचबरोबर कोकबन प्राथमिक आरोग्य केंद्रातही उपचार न झाल्याने भांडणात जखमी झालेल्या विरजोली (ता.रोहा) येथील पाच जखमींवर नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले.
विरजोली गावात आज सकाळी झालेल्या भांडणात कोयत्यासह इतर हत्यारांचा वापर करण्यात आल्याने भांडणात सहभागी झालेल्या दोन्ही गटांकडून एकमेकांची डोकी फोडण्यात आली होती. त्यामुळे रक्तबंबाळ अवस्थेत या पाच जणांना नागोठण्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणण्यात आले होते. या पाच जणांच्या डोक्याला मारहाणीत मोठ्या प्रमाणात जखमा झाल्या असल्याने त्यामधून त्यामधून मोठ्या प्रमाणत रक्तस्त्राव होत होता. त्यामुळे त्यांना नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रात आणताच येथील वैद्यकीय अधिकारी डाॅ. चेतन म्हात्रे त्यांच्या सहका-यांकडून या जखमींच्या डोक्याला तातडीने टाके मारण्याचे काम करण्यात आले. दोन-तीन जखमींच्या डोक्याला तर मोठ्या जखमा असल्याने आठ ते दहा टाके मारावे लागले. मात्र अशातच या जखमींच्या डोक्यातील जखमांमधून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत असल्याने जर नागोठण्यात पोहोचे पर्यंत या जखमींवर काही अघटित झाले असते तर ? असा प्रश्नही उपस्थित होत आहे. त्यामुळे कोरोना महामारीच्या काळात इतर रुग्णांची तेथील जवळच्या सरकारी रूग्णालयात होणारी हेळसांड थांबविण्यासाठी शासनाच्या आरोग्य खात्याने आवश्यक ती उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.






Be First to Comment