सिटी बेल लाइव्ह / खांब-रोहे (नंदकुमार मरवडे)
रोहे तालुक्यातील कारिवणे येथे बांधण्यात येत असलेल्या चार पैकी दोन बंधा-यांचे काम पुर्ण झाले आहे. तर बांधलेले बंधारे पुर्ण क्षमतेने भरले असून नुकतेच रायगडचे खा.सुनील तटकरे यांनी या बंधाऱ्यांची पाहणी करून समाधान व्यक्त केले आहे.
उर्वरित दोन बंधाऱ्याचे काम पुर्ण झाल्यावर लांढर गावासह आजूबाजूचा परिसर तसेच रोहे शहरालगतच्या आजूबाजूला परिसरातील गावांना या बंधा-याच्या पाण्याचा उपयोग होऊन पाणी टंचाईची समस्या मार्गी लागणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
तालुक्यातील कारिवणे येथे डोंगर माथ्यावर बारमही वाहणारे जीवंत पाण्याचे झरे असून यामुळे येथे कायमच मोठा जलसाठा पहायला मिळतो.पुर्वी याच जलसाठ्यातून रोहे शहर व आजूबाजूच्या परिसरात पाणी पुरवठा केला जात असे.
हे पाणी ग्रिव्हीटिने येत असल्याने यासाठी कोणताही आर्थिक भार पडत नसे.कालांतराने हे जलस्त्रोत दुर्लक्षित झाले.परंतू सध्या रोहे शहराचे झपाट्याने होत असलेले नागरिकीकरण यामुळे पाणी समस्याही गंभीर बनत चालली असतानाच खा.सुनील तटकरे यांनी स्वतः जातीने लक्ष देऊन कारिवणे येथील जलस्त्रोताचे पुनर्जीवन व साठवणुकीसाठी जातीने लक्ष दिले आहे. कारिवणे बंधाऱ्याचे काम मार्गी लागावे यासाठी पालकमंत्री आदिती तटकरे यांनीही निधी उपलब्ध करुन दिला आहे. तर रोहे न.पा.च्या ७ एकर जागेमध्ये ठिकठिकाणी चार बंधा-याचे बांधकाम करण्यास प्रारंभ करण्यात आले असून दोन बंधाऱ्यांचे काम पुर्ण होऊन उर्वरीत दोन बंधा-यांचेही काम लवकरच मार्गी लागणार आहे. खा.सुनील तटकरे यांच्या हस्ते नुकतेच जलपूजनही करण्यात आले आहे.
खा.सुनील तटकरे यांनी स्वत::जातीने लक्ष देऊन बंधाऱ्यांचे काम नियोजित वेळेत पुर्ण व्हावे याकरिता तालुका क्रुषी अधिकारी यांनीही सुचना केल्या आहेत.तर या पाणी साठ्यामुळे लांढर,वाशी,बोरघर,तळाघर,निवी,भुवनेश्वर, वरसे व रोहे शहराला चांगला पाणीसाठा उपलब्ध होणार असून या महत्वाकांक्षी प्रकल्पाकडे खा.सुनील तटकरे व पालकमंत्री आदिती तटकरे यांनी जातीने लक्ष देत आहेत.






Be First to Comment