Press "Enter" to skip to content

महाराष्ट्र बंद वर विक्रांत पाटील यांची जळजळीत प्रतिक्रिया

महाविकास आघाडीचा महाराष्ट्र बंद चा हास्यास्पद प्रयत्न : विक्रांत पाटील, प्रदेश अध्यक्ष भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र

महाराष्ट्र बंद चां हास्यास्पद प्रयत्न महविकास आघाडी सरकार करीत आहे.
मावळ मधल्या पाण्यासाठी हक्क मागणाऱ्या निशस्त्र शेतकऱ्यांच्या पाठीवर गोळीबार करणारे हे आघाडी सरकार!
शेतकऱ्यांचे सहकारी साखर कारखाने स्वतःच्या घशात घालणारे हे आघाडी सरकार !
अतिवृष्टी,वादळ काळात शेतकऱ्यांच्या अश्रुंकडे पाठ फिरवनारे हे आघाडी सरकार!
शेतकऱ्यांच्या शेतातील वीज कापून शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारे हे आघाडी सरकार!
तुम्ही कसला शेतकऱ्यांच्या कल्याणाचा आव आणता?
सरकार राज्य कसे काय बंद करू शकते?
महाराष्ट्र म्हणजे काय तुम्हाला वडिलोपार्जित मिळालेली प्रॉपर्टी वाटते का?
ऐन सणासुदीच्या वेळेला कोळशाच्या अपुऱ्या साठ्या अभावी महाराष्ट्र अंधारात जाऊ शकतो ही स्थिती आहे,त्याच्यावर बोला,तुम्ही शेतकऱ्यांची नुकसान भरपाई कधी देणार त्याच्यावर बोला,शेतकऱ्यांची वीज का कापली यावर बोला!
तुमचे बेगडी शेतकरी प्रेम जनता जाणून आहे.
मुंबई मध्ये सत्ता तुमची आणि बेस्ट बसेस फोडताना लाज नाही का वाटत?
ज्या नेत्यांनी ही बंद ची घोषणा केली त्यांच्यावर या सर्व नुकसानाचे गुन्हे दाखल व्हावेत ही मागणी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने करीत आहे.

विक्रांत पाटील
प्रदेश अध्यक्ष
भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.