Press "Enter" to skip to content

सलग दोन दिवस सात जणांना चावणारा कुत्रा जेरबंद


पनवेल, दि.26 (वार्ताहर) ः पनवेल शहरात लाईन आळी परिसरात सलग दोन दिवस सात जणांना चावणारा कुत्रा अखेरीस पनवेल महापालिकेच्या श्वान पथकाने जेरबंद केला आहे.

एक फिरस्ता कुत्रा रस्त्यातील पादचाऱ्यांना चावत असल्याची माहिती स्थानिक नगरसेविका दर्शना भोईर यांना काही जागृत नागरिकांनी दिली. त्यांनी तातडीने उपजिल्हा रुग्णालयाचे आरोग्य निरीक्षक डॉ.भगवान गीते, डॉ.मधुलिका लाड यांच्याशी संपर्क साधून चावा बाधित रुग्णांना आवश्यक ते उपचार करण्यास सांगितले. त्याचप्रमाणे महापालिकेच्या श्वान पथकातील डॉग कॅचर निरीक्षक कल्पेश कदम, रोहित कदम, सुमित कदम, किरण सावंत, चालक संजय कदम आदींमार्फत परिसरात दोन दिवस शोध घेवून त्या कुत्र्याला ताब्यात घेतले आहे. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.