संकट निवारिणी
शरणागती मी पत्करूनी
आले माते ग तव चरणी
पाप संकटा दूर सारूनी
उद्धरी माझी हर करणी ।।
अर्धचंद्र मस्तकी मिरवी
दिव्य सुगंधा मनी ठसवी
अलौकीक त्वा दर्शन घेण्या
नित्य भजते मी उपासनी ।।
धाव तू संकट निवारिणी
शांतीदायक तूच कल्याणी
पवित्र कर्मे ठेव म्या मनी
कृपा ठेव तू त्वा नयनी ।।
सौ.अदिती गोखले, नवीन पनवेल








Be First to Comment