“सिटी बेल लाइव्ह” च्या बातमीची दखल
सिटी बेल लाइव्ह / नागोठणे (महेश पवार) :
राज्य सरकार कडून राज्यातील ३०९ अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना निवृत्तीवेतन मंजूर करण्यात आले आहे. रायगड जिल्ह्यातील अकरा अधिस्वीकृतीधारक पत्रकारांचा त्यामध्ये समावेश आहे. त्यामुळे या ज्येष्ठ पत्रकारांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना हे निवृत्ती वेतन पुढील महिन्यापासून सुरु करण्यात येणार असल्याचे राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
रायगड जिल्हा पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष व नागोठण्यातील ज्येष्ठ पत्रकार नवीन सोष्टे यांनी केलेल्या मागणीनुसार “रायगड जिल्ह्यातील अधिस्वीकृतीधारक पत्रकार अद्यापही निवृत्ती वेतनापासून वंचित” या मथळ्या खाली “सिटी बेल लाइव्ह” मध्ये काही दिवसांपूर्वीच बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. याची दाखल घेत राज्यमंत्री व जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी याप्रकरणी जातीने लक्ष टाकून हा प्रश्न मार्गी लावला आहे. यासंदर्भात आदिती तटकरे यांनी नवीन सोष्टे यांच्याशी संपर्क साधून आपली मागणी मंजूर करण्यात आल्याचे सांगितले. यासाठी नवीन सोष्टे यांनीही आदितीताई तटकरे व राज्य सरकारचे तसेच “सिटी बेल लाइव्ह” चे ☺,=-,=०आभार मानले आहेत.






Be First to Comment