सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत अज्ञात व्यक्तीचा आकस्मित मृत्यू झाल्याची नोंद करण्यात आली आहे.
काल दि.9 ऑक्टोबर रोजी कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत कर्जत शहरात मयत याने कोणत्यातरी अज्ञात कारणाने कोणतेतरी अज्ञात विषारी औषध प्राशन केले असल्याने त्याचा उपचारा दरम्यान मयत झाला आहे. कर्जत पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू र.नं. 39/2021 सी आर पी सी 174 प्रमाणे नोंद करण्यात आली आहे.
मयत अज्ञात इसम नाव गाव समजून येत नाही. त्याचे वर्णन वय 30 ते 35 वर्ष, ऊंची 165 सेमी, गहुवर्ण, सडपातळ, केस बारीक, दाढी बारीक राखलेली, नेसून मळकटलेला फुल शर्ट, निळ्या रंगाची पॅन्ट, डावे हातावर कापलेले जखम आहे. पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदारआकाश राठोड अधिक तपास करीत आहेत.
वरील वर्णनाचा इसम आपले पोलीस ठाणे हद्दीत बेपत्ता असल्यास इकडील पोलीस ठाण्यात संपर्क करणेस विनंती पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आली आहे.







Be First to Comment