सिटी बेल लाइव्ह / पाणदिवे (प्रतिनिधी )
२८ जुलै जागतिक निसर्ग संवर्धन दिनानिमित्त तालुका उरण मधील चिर्ले येथील दुधेला डोंगराच्या आई एकविरा माता मंदिर परिसरात बीजरोपण, वृक्षारोपण व तेथील काही परिसराची स्वच्छता करण्यात आली.
नेहरू युवा केंद्र अलिबाग ( भारत सरकार ) ,महाराष्ट्र युवा प्रतिष्ठान पाणदिवे,स्व.संगिता मच्छिंद्र ठाकूर फांउडेशन धुतुम,वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्था उरण,जाणिव सेवाभावी संस्था उलवे,स्व.तृप्ती सुधीर सुर्वे फांउडेशन उरण ,स्व.स्मिता नामदेव घरत फांउडेशन गव्हाण आणि रायगड भुषण मनोज पाटील सर यांच्या मार्गदर्शनाखाली एकत्र येवुन हा कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यात आले.
सदर कार्यक्रमासाठी उलवे येथील समाजसेवक किरण मढवी यांच्या मार्फत २०० बीजगोले व ५१ देशी वृक्ष देण्यात आले होते.
सदर कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद सदस्य वैजनाथदादा ठाकूर,महाराष्ट्र युवा प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष मनोज पाटील,समाजसेवक किरण मढवी, आनंद मढवी, वनक्षेत्रपाल शशांक कदम, वनपाल डी.डी.पाटील, वनरक्षक सूरदास दांडे, किरण देवकर, सी.एस.बोरसे, सन्नी ढोले, माया भोसले, सुप्रिया कसबे, मिलिंद भोईर, नेहरू युवा केंद्रांचे माजी स्वयंसेवक आकाश घरत, पंकज घरत, बंटी शेलके, कल्पेश ठाकूर, पत्रकार सुर्यकांत म्हात्रे, महेश भोईर आदी मान्यवर उपस्थित होते.
ह्या लावलेल्या रोपांचे योग्य ती निगा राखली जाईल असे मत चिर्ले येथील पक्षी मित्र आंनद मढवी यांनी व्यक्त केले.
दरवर्षी असेच एकत्र सर्वांनी येवुन वृक्षलागवडीचा संकल्प करुन उरण तालुक्याला सुजलाम सुफलाम करण्याचा निर्धार केला या वेळी उपस्थित संघटनांनी केला. सदर कार्यक्रमात सोशल डीस्टंसिंग, सॅनिटायझर तसेच कोवीड-19 च्या सर्व अटी व शर्थी चे पालन करण्यात आले होते. शेवटी वनपाल डी. डी. पाटील साहेब यांनी सर्वांचे आभार मानुन कार्यक्रमाची सांगता केली.






Be First to Comment