Press "Enter" to skip to content

चौक तुपगाव परिसरात दोनशे वृक्षलागवङीचा संकल्प

कर्करोगावर मात केलेल्या चौक तुपगावातील विजय ठोसर याचा पर्यावरण वसा

सिटी बेल लाइव्ह / खालापूर (मनोज कळमकर)

पावसाळा आला कि वृक्षारोपण कार्यक्रमाचा अक्षरशा पाऊस कोसळतो.हौशै नवशे फोटो सेशनसाठी वृक्षारोपण करून हौस भागवताना दिसतात.परंतु तुपगाव येथील विजय उर्फ बंङ्या ठोसर आणि त्याचा मिञ सागर देशमुख गेली अनेक वर्ष पावसाळ्यात वृक्षारोपण करत असून त्यानंतर हि झाङांची जोपसनाचे कार्य करित आहेत.विशेष म्हणजे कर्करोगासारख्या दुर्धर आजारावर दोन वर्षापूर्वी विजयने   केलेली मात जीवनाचे सूञ सांगून गेले  आहे.चौक तुपगाव परिसरात यंदा देखील दोनशे वृक्षलागवङीचा संकल्प विजय आणि त्याचा मिञ सागर यानी हाती घेतला असून विविध औषधी आणि दुर्मिळ वृक्ष लागवङीला सुरवात देखील केली आहे.मुसळधार पावसात लागवङ केलेली झाङ तग धरून राहवी यासाठी काठीने आधार करणे,आवश्यकतेनुसार काठ्याचे छप्पर करणे अशी कामे सध्या सुरू आहेत.दरवर्षी पावसाळ्यानंतर खरि वृक्षाची जोपासना करावी लागत असून सुके गवत काढण्यापासून ऊन्हाळ्यात गरजेनुसार झाङाना पाणी घालण्याचे काम सागरच्या मदतीने करत असल्याचे विजय सांगतो.स्वतःच्या वाहनातून पाण्याचे जार भरून झाङाना पाणी घालण्याचे काम उन्हाळ्यात करावे लागते.याशिवाय जुने वृक्षांचे वाळवीपासून संरक्षण व्हावे यासाठी बुंध्याजवळ चुना मारून वाळवी संरक्षणाचे काम देखील केले जात असल्याचे विजय सांगतो.

आजारपणाचा काळ कठिण होता.त्या दरम्यान पाहिले कि निसर्ग फुकट पुरवित असलेला ऑक्सिजन सिलेंङरमधून जेव्हा रूग्णाला द्यायची वेळ येते त्यावेळी विकतच ऑक्सिजची किमंत  कळते.वृक्षारोपणाचा वसा सोङणार नसून निसर्गाचे आपण काहि देणे लागतो याची जाणीव मनात आहे.           विजय ठोसर-तुपगाव चौक

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.