Press "Enter" to skip to content

कोलाड पोलिसांनी पुगाव जवळ जनावरांचा टेंपो पकडला : टेम्पोत सापडल्या दोन मेलेल्या गाई

सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम |

मुंबई-गोवा हायवे वरील पुगाव गावाच्या हद्दीत दत्ताराम वसंत अधिकारी यांच्या चेतन टी स्टॉल जवळ अब्दुल कादीर शफीउल्ला मन्सूरी वय ३२ वर्ष रा. वसई फाटा मुल्लत नगर, जि. ठाणे यांच्या ताब्यातील आयशर टेम्पो क्र. एम एच ०२एफ जीं.१८४२यामध्ये पाळीव प्राणी /गुरे वाहून नेण्याचा परवाना नसताना गीर जातीच्या ५ गाई व तीन वासरे असे एकूण ८जनवारे पालवणी मंडणगड वसोना गुजरातकडे घेऊन जात असतांना सदर गु्रांची योग्य ती सुरक्षा न घेतल्यामुळे आठ पैकी २ गाई मरण पावल्या असल्यामुळे टेम्पो चालक यांच्या वर कोलाड पोस्टे गु र न ०८५/२०२१ प्राण्यांना निर्दयतेने वागणूक करण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० कलम ११ मो वा कायदा १९८८ कलम६६ /१९२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, टेम्पोचालक यास ताब्यात घेण्यात आले असून,सदर टेम्पोत असलेले ६ गीर गायी पाहूर येथील डॉ भट यांच्या गोशाळेत संरक्षण कमी ताब्यात देण्यात आले आहेत व दोन मयत झालेले गायीचे पशुवउद्यकीय अधिकारी रोहा यांच्याकडून पोस्ट मारतुम करून घेण्यात येत आहे अधिक तपास सपोनि सुभाष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहा फौजदार ए आर सायगावकर पोहवा ए आर म्हात्रे पोहवा नरेश पाटील करीत आहेत, कोणताही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न नाही यातील चालक याच्याकडे गुरे चेक केल्याचे पशु वैद्यकीय अधिकारी दापोली यांचे फिटनेस सर्टिफिकेट व चेक रिपोर्ट व वाहतूक परवाना होता फक्त योग्य काळजी घेतली नाही व गायीची मृत्यूस कारणीभूत झाल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.