जगन्मातेचे रूप
जगन्मातेचे रूप दिसे ठायी ठायी
चराचर अवघे ती व्यापुनिया राही
जसे बीज अंकुरते भूगर्भातुन
तसे बाळ जन्मते आईच्या उदरातून
धन-धान्य रूप लक्ष्मीचं, करिते उदर भरणं
कष्ट करून मिळता पैसा होते सुख निर्माण
नीर वाहे सरितेचे,असे अमृतासमान
तृष्णा भागवून साऱ्यांची,फुलविते जीवन
दुर्गेचे रूप घेऊन ललना करिती दुष्टांचे निर्दालन
मायेचे पांघरूण घालूनी अनाथांचे करती संगोपन
कोणी देतसे शिक्षण,कला, विद्येचे उघडे दालन,होई समाज सुदृढ,मंगलतेचे घडे दर्शन
सारी रूपे तिची अशीच भक्ता रक्षाया
सगुण-निर्गुण रुपात मन अधीर तिज पहाया.
करू भजन,पूजन मिळे मना समाधान
आई अंबेचा उत्सव,येई उत्साहा उधाण.
करू तीचे नित्य स्मरण,गाऊ तिचे गुणगान
आई म्हणून हाक मारिता येई माऊली धावून.
सौ.संध्या करंदीकर, नवीन पनवेल







Be First to Comment