सिटी बेल | खालापूर | मनोज कळमकर |
ऑनलाईन मोबाईल रिचार्ज करताना आलेला आणि डाऊनलोड केलेले ॲप खोपोलीत जेष्ठ नागरिकाला चांगलेच महागात पडले असून बँक खात्यातून सुमारे 2 लाख 14 हजार 700 रूपये सायबर चोरट्यांनी काढले आहेत.
खोपोलीत आंनदी पार्क, रुम नं.02, लक्ष्मीनगर येथे राहणारे आदिनाथ बापू देसाई (वय67) त्यांचे बीएसएनएल मोबाईल नंबरवर रिचार्ज करीत असताना त्यांचे मोबाईलवर अनोळखी क्रमांकावरून फोन आला. समोरील व्यक्तिने केवायसी अपडेट करावे लागेल असे सांगितले. त्याप्रमाणे देसाई यांनी आधारकार्ड आणि पॅनकार्ड फोटो काढून पाठवले. त्यानंतर समोरुन बोलणा-या व्यक्तीने मोबाईलमध्ये टिम व्हिवर अॅप डाउनलोड करण्यास सांगितले.त्याप्रमाणे देसाई यांनी ॲप डाऊनलोड केले. पुन्हा व्हाईस काॅल येवून दहा रुपये फि नेट बॅंकिगने पाठविण्यास देसाई याना सांगण्यात आले. दहा रुपये नेट बॅंकिगने पाठविल्यानंतर काही वेळातच देसाई यांच्या सेन्ट्रल बॅक ऑफ इंडिया शाखा खोपोली खात्यातून 2 लाख 14 हजार 700 रुपये काढण्यात आले.फसवणूक झाल्याचे लक्षात येताच देसाई यांनी अज्ञात इसमा विरोधात खोपोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
भा.दं.वि.क.420 माहिती तंत्रज्ञान अधिनियम,2000 (2008 चे सुधारणेसह) 66 ड प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक शिरिष पवार करीत आहेत.








Be First to Comment