Press "Enter" to skip to content

सोनाराला गंडा घालणारी बबली खोपोली पोलीसांच्या ताब्यात

सिटी बेल | खालापूर | मनोज कळमकर |

खोपोलीत पेढीवर गिऱ्हाईक बनून आलेल्या बंटी बबलीने 60 हजार रुपये किंमतीची सोन्याची सर चोरून नेल्याची घटना दोन सप्टेंबर रोजी खोपोलीत घडली होती खोपोली पोलिसांनी कौशल्याने तपास करत बबलीला ताब्यात घेतले असून महाराष्ट्रासह इतर राज्यात देखील बबली ने हाथ की सफाई दाखवले असून तिच्यावर वीस ते पंचवीस गुन्हे दाखल आहेत.

गणपतलाल राजमलजी मेहता (वय 54) यांची आशीयाना टॉवर येथे गायत्री ज्वेलर्स पेढी आहे. 2सप्टेंबर रोजी गुरूवारी सकाळी साडे दहाच्या सुमारास एक महिला व एक पुरूष पेढीवर येवून सोन्याचे सर दाखविण्यास सांगितले . दुकानातील कामगार यांनी सोन्याचे सर दाखवले.
परंतु वेगवेगळे सर पाहून पसंत नसल्याचे सांगत जोडपे दुकानातून निघून गेले. त्यानंतर काही वेळाने 14 ते 15 ग्रॅम वजनाचे सोन्याची सर नसल्याचे गणपतलाल यांच्या लक्षात आल्यानंतर बोलण्यात गुंतवून सोन्याची सर लंपास केल्यात आल्याचे मेहता यांच्या लक्षात आल्यानंतर
त्यांनी पोलीस ठाण्यात दिली होती.

या घटनेनंतर व्यावसायिकांमध्ये भीती वातावरण होते. रायगड पोलीस अधीक्षक अशोक दुधे अपर पोलीस अधीक्षक .अतुल झेंडे यांनी गुन्हे उघडकीस आणणेबाबत सूचना दिल्या होत्या. त्याप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी खालापूर .संजय शुक्ला खोपोली पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी अधिकारी सहा.पोलीस निरीक्षक राकेश कदम व पोलीस विशेष पथकानी घटनेच्या ठिकाणी सी.सी.टी.व्ही फुटेज संकलित करून ते जिल्ह्यात आणि राज्यात प्रसारित केले.

सी.सी.टी.व्ही फुटेज मधील आरोपी महिला हि अट्टल चोर असून महाराष्ट्र राज्यातील पुणे, नवी मुंबई, मुंबई,सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच कर्नाटक, हैद्राबाद राज्यात 20 ते 25 चोरीचे गुन्हे दाखल असल्याचे तपासात निष्पन्न झाले. आरोपित महिला व तिचे फरारी साथीदार यांना पकडण्यासाठी राज्यातील पोलीस प्रयत्नात होते.खोपोली पोलीस पथकाने खोलवर तपास करत महिला आरोपी हिला सातारा येथून ताब्यात घेवून चौकशी केली असता तिने खोपोली येथील ज्वेलर्स दुकानात चोरी केल्याची कबुली दिली.

चोरीस गेले मालाबाबत विचारपूस करता तिने सदरचा माल व इतर ठिकाणचा चोरून नेलेला माल तिचे सहसाथीदार आरोपित यांचे मार्फतीने अहमदाबाद, राज्य-गुजरात येथील ज्वेलर्स दुकानदार यास विक्री केल्याचे सांगितले. त्याप्रमाणे खोपोली पोलीस पथकाने अहमदाबाद, राज्य-गुजरात येथे जावून ज्वेलर्स दुकान मालक यास ताब्यात घेवून त्याचे कडून चोरीचा 60हजार रुपये किमतीचा 14 गॅम वजनाचा सोन्याचे सर जप्त केला आहे. इतर साथीदारांचा शोध सुरू आहे.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक
पोलीस निरीक्षक राकेश कदम व सोबतचे पोलीस अंमलदार पोलीस हवालदार प्रसाद पाटील, पोलीस शिपाई प्रदीप खरात, प्रवीण भालेराव ,स्वागत तांबे, मपोशी सावित्र कांगणे यांच्या प्रयत्नातून सदरचा गुन्हा उघडकीस आला आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.