Press "Enter" to skip to content

पर्यटकांच्या सामानावर डल्ला मारणारी दुक्कल अटक : पनवेल तालुका पोलिसांची कारवाई

सिटी बेल | पनवेल |

पनवेल परीसर झपाट्याने विकसित होत असला तरीही येथे बऱ्याच अंशी निसर्ग अबाधित आहे.पावसाळ्यात आशा निसर्गरम्य ठिकाणी हौशी पर्यटक फिरण्यासाठी येत असतात. पावसात, ओढ्यात किंवा नदीत भिजण्यासाठी जाणारे पर्यटक त्यांचे मोबाईल, पाकीट,कपडे असे सामान गाड्यांच्यात ठेवतात.अशा पर्यटकांच्या गाड्या शिताफीने उघडून त्यातील ऐवज लंपास करणाऱ्या दुक्कलीला पनवेल तालुका पोलिसांनी अटक केली आहे. या दोन आरोपींकडून पोलिसांनी 1 लाख 92 हजार रुपये किमतीचे 16 मोबाईल जप्त केले आहे. हे दोन्ही आरोपी पनवेल तालुज्यातील वावंजे गावातील रहिवाशी आहेत.

रमेश रघुनाथ पाटील, 32 वर्षे, रा. जिल्हा परिषद शाळेचे जवळ, वावंजे,जितेश भगवान जोगले,वय 24 वर्षे रा. कुंभारपाडा, वावंजे, पनवेल,असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पनवेल शहरातील वर्षा अभय पाटील वय 41 वर्षे, ह्या गुरुवारी दि.30 सप्टेंबर 2021 रोजी आपल्या कुटुंबियांच्या समवेत पनवेल तालुका परिसरातील पर्यटनासाठी गेल्या होत्या. यावेळी त्यांच्या सगळ्यांचे मोबाईल एका सॅकबॅगमध्ये ठेवून ती सॅकबॅग ईको कारमध्ये ठेवून गाडी पार्क करून ते सारे मोहदर नदीकाठी फिरण्यासाठी गले होते.

यावेळी कोणीतरी अज्ञात चोरटयांनी ईको कारचे डिक्कीचे लॉक तोडुन त्यामध्ये ठेवलेले फिर्यादी यांचे मोबाइल सॅकबॅग मधून चोरले.चोरी झाल्याचे लक्षात येताच पाटील यांनी पनवेल तालुका पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली.पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र दौंडकर यांच्या  मार्गदर्शनाखाली तांत्रिक तपास व गुप्त बातमीदाराच्या साहाय्याने माहीती घेवून सखोल तपास करत दोन्हीआरोपीना मंगळवारी  वावंजे गावातून अटक केली आहे.

अधिक तपास केला असता 4 मोबाईल व इतर चोरी केलेले 12 मोबाईल असे एकुण 16 मोबाइल एकूण किंमत रु. 1,92,000 /- चा मुद्देमाल आरोपीकडून हस्तगत करण्यात आला आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.