शारदीय नवरात्र
शारदीय नवरात्रासाठी,
देवीच्या जागरासाठी,
घराघरात सजावट पूर्ण झाली ,
अखंड ज्योत अन घटस्थापना झाली.
आई जगदंबे ये घरी, आशिष देण्यासाठी.
कोल्हापूरची अंबाबाई,
तुळजापूरची भवानी आई,
वणीची सप्तशृंगी अन,
माहूरची रेणुका माई ,
आई जगदंबे ये घरी, आशिष देण्यासाठी.
शैलपुत्री, ब्रह्मचारिणी,
स्कंदमाता अन कात्यायनी,
चंद्रघंटा ,कुष्मांडा, कालरात्री,
महागौरी अन सिद्धधात्री .
या नवदुर्गाचे दर्शन देण्यासाठी ,
आई जगदंबे हे घरी, आशिष देण्यासाठी.
सर्वांना आरोग्य मिळो,
धनदौलत कमी न पडो
दुःखाचा लवलेशही न उरो,
आबाल वृद्धास सुखी करण्यासाठी ,
आई जगदंबे ये घरी, आशिष देण्यासाठी.
अनघा अंबपकर, नवीन पनवेल







Be First to Comment