खोटे सोने गहाण ठेवून बॅंकेला लाखोंचा चुना : खारघर पोलिसांनी केली टोळी गजाआड
सिटी बेल | पनवेल |
कामोठे येथील प्रमोद गर्ग याने दाखल केलेल्या तक्रारीचे मूळ थेट खरघरच्या ग्रेटर बॉम्बे बँकेत सापडले.नेरुळ येथील 30 वर्षीय ज्वेलर भरत शुभसिंग राजावत हा सगळ्याचा सूत्रधार असून त्याची “नकली सोनेपे असली पैसा!”स्कीम पोलोसांनी उध्वस्त करून त्याच्या मुसक्या आवळल्या.
सावीआ मार्टिन याने प्रमोद गर्ग यास माझे बँकेतील दागिने सोडवून दे,व तू ते ठेऊन मला आणखीन पैसे दे असे सांगितले.प्रमोद याने पैसे देऊन बँकेतील गहाण दागिने सोडविले परंतु ते दागिने खोटे असून केवळ मुलामा दिलेले असल्याचे निष्पन्न झाले.त्याने पोलिसात तक्रार दाखल करताच व पो नी संदीपान शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली.तपासात बँकेच्या वतीने सोन्याचा दर्जा तपासून त्याचे समोर तारण कर्ज किती द्यावे याचा सल्ला देणारा ज्वेलर भरत शुभसिंग राजावत हाच सगळ्याचा सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाले.
आपल्या मित्रांच्यानावे कर्जे उचलून त्या जागी खोटे दागिने तारण ठेवणारी टोळी पोलिसांनी पकडली आहे. सविओ वेंसन मार्टीन, परशुराम सखाराम देवरुखकर, सुनील मच्छिंद्र फराटे यांना देखील अटक केली आहे. या प्रकरणात पोलिसांना अद्याप धनसुकलाल शिंघवी, नेरूळ येथील पियुष जैन,खेमराज रत्नाकर भगत आणि ऊसरली येथील विजय प्रेम गुप्ता यांचा शोध घ्यायचा आहे.
परिमंडळ 2 चे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील आणि सहाय्यक पोलीस आयुक्त भागवत सोनावणे यांच्या सुचनेने झालेल्या तपासात व पो नी संदीपान शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक विमल बिडवे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप सहाय्यक पोलीस निरीक्षक अरुण पढार व त्यांच्या टीम उत्तम कामगिरी केली.








Be First to Comment