Press "Enter" to skip to content

मेढा ग्रामपंचायत हद्दीत कोरोना प्रतिबंधक लसिकरण

सिटी बेल | रोहा | नंदकुमार मरवडे/उदय मोरे |

संपूर्ण देश कोरोना जागतिक महारारी सोबत सामना करत असताना कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेण्याचे सरकार तर्फे आवाहन होत असताना रायगड जिल्ह्याचे लोकप्रिय खा.सुनील तटकरे यांच्या आशिर्वादाने तसेच रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे व आ.अनिकेत तटकरे यांच्या सहकार्याने रिलायन्स कंपनी मार्फत मेढा ग्रामपंचायत हद्दीतील लाभार्थ्यांना कोरोना प्रतिबंधक लसीचा उपक्रम राबविण्यात आला.

सदर उपक्रमामध्ये १५० लसीचे वाटप केले असून अनेक नागरिकांनी सदर उपक्रमामध्ये लस टोचून घेतली सदर कार्यक्रमा आ.अनिकेत तटकरे यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवुन लसीकरण बद्दल माहिती घेउन योग्य ते मार्गदर्शनपर सुचना दिल्या. आ.अनिकेत तटकरे यांच्या समवेत पं.स.माजी सभापती लक्ष्मण महाले, राकेश शिंदे ,रोहा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस युवक अध्यक्ष श्री.जयवंत मुंडे , रोहा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस युवक कार्याध्यक्ष मयूर खैरे, डॉ. गजानन ससाणे, मेढा हायस्कुल चेअरमन भगवान के. गोवर्धने, उपसरपंच उदय मोरे , सदस्यां श्रेजल उंबरे ,नम्रता महाले , ग्रामसेवक अमोल तांबडे , नथुराम महाले,जितेंद्र जाधव, विजय मोरे, शरद गोवर्धने ,शुभम उंबरे, प्रतीक वजले,छगन लाड, रागिणी गोवर्धने, मनीषा घरटं, प्रमिला भोईर उपस्थित होते.

याप्रसंगी ग्रुप ग्रामपंचायत मेढाच्या वतीने डॉ.गजानन ससाणे आणि डॉ.सुशांत जाधव यांच्या सत्कार करण्यात आला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.