Press "Enter" to skip to content

कर्जतच्या आदिवासी वाड्यांवर लसीकरण शिबीर संपन्न : 200 जणांनी घेतला लाभ

किरवली ग्रुप ग्रामपंचायतीच्या ग्रामपंचायत सदस्या मोनिका बडेकर यांचा पुढाकार

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |

कर्जत तालुक्यातील किरवली ग्रुप ग्रामपंचायतीच्या हद्दीतील किरवली, सावरगाव आणि आषाणे ठाकुरवाडी मधील आदिवासी बांधवासाठी लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.त्या त्या वाडीवर जाऊन हे लसीकरण करण्यात आले.

शहरी भागात लसीकरण शिबिरे मोठ्या प्रमाणात घेतली जात आहेत, मात्र ग्रामीण विशेषतः आदिवासी वाड्या पाड्यावर ती घेतली जात नाहीत, आणि अजून त्या बांधवांमध्ये जनजागृती नसल्याने ते लसीकरणाकडे वळत नाहीत. या गोष्टीचा विचार करून ग्रामपंचायत सदस्या मोनिका निलेश बडेकर यांनी कर्जत उपजिल्हा रुग्णालयाच्या सहकार्याने लसीकरण शिबिराचे आयोजन केले होते.

उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक डॉ. मनोज बनसोडे, कर्जत पोलीस ठाण्याच्या पोलीस निरिक्षक सुवर्णा पत्की, उद्योजक निलेश बडेकर, सरपंच संतोष सांबरी यांनी शिबिरास भेट दिली. उप जिल्हा रुग्णालयाच्या डॉ. संगीता दळवी यांच्या मार्गदर्शखाली हे लसीकरण संपन्न झाले. 200 जणांनी कॉवाक्सिन लसीचा डोस घेतला. किरवली, सावरगाव आणि आषाणे ठाकुरवाडी मध्ये जाऊन लसीकरण करण्यात आले. लसीकरण आपल्या दारी त्यामुळे आदिवासी बांधवांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.