संस्कृतीचा जागर
स्वराज्याचे मंगल तोरण बांधून यवनाकडून रक्षण केले राष्ट्रमाता जिजाऊंच्या छत्रपती शिवबानं ,
पवित्र ज्ञान कार्याची कवाडे उघडून दिली क्रांतीसुर्य ज्योती सावित्रीने
अमानुष सतीची चाल बंद केली राजाराम मोहन रॉय यांनी, ओव्या अभंगांनी नवलाई दिली संत ज्ञानोबा तुकोबानी रंजल्या-गांजल्यांची सेवा गाडगेबाबांनी दावली,
कर्म ज्ञान भक्ती साने गुरुजींनी सांगितली ,
शांती अहिंसेच्या उपदेशाने बुद्धांनी केले जीवन श्रीमंत .
समाजप्रबोधनाचे धडे देऊनी संत तुकडोजी ,बाबा आमटे यांनी मानव ठेवला जिवंत,
सेवा- सहकार्याचे सामर्थ्य अलोकिक लाभले सृष्टीस वरदान
फुले, शाहू आंबेडकर ,कर्वे सावरकरांचा करू सन्मान,
कृतज्ञ होऊनिया आपण समाजासाठी पेलण्याचे आव्हान .
जपुया सदा नैतिक मूल्य संस्कृतीचा नका करू अपमान, मुलगा मुलगी समान मानुनी
स्त्रियांचा रोखू अवमान. निसर्गाचे रुप जतन करूनी समाज मूल्य समाज उन्नती करू महान.
पुर्णिमा शिंदे
आकाशवाणी निवेदिका, मुंबई







Be First to Comment