Press "Enter" to skip to content

रसायनी पोलिसांनी केला वाशिवली ठाकुर वाडीतील गावठी हातभट्टीचा अड्डा उध्वस्त

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |

रसायनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील वाशिवली ठाकुर वाडीतील डोंगराळ भागात गैरकायदा गावठी दारुची हातभट्टी असल्याची माहिती रसायनी पोलिसांना मिळाली होती.त्यानुसार पोलिस निरीक्षक कैलास दादाभाऊ डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली रसायनी पोलिसांनी शिताफीने छापा टाकून गैरकायदा गावठी हातभट्टीचा अड्डा उध्वस्त केला आहे.

यावेळी वाशिवली ठाकुर वाडीतील काळूराम अंबो भुरवडे यांनी गैरफायदा गावठी हातभट्टीची दारु तयार करण्याचे साहित्य व रसायन तसेच गावठी हातभट्टीची तयार दारु असे एकूण मिळून 86770 रुपये किंमतीचा माल मिळून आला.

हि कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक कैलास डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक धनाजी काळे, पोलिस हवालदार अमित कवले,नंदन पाटील, जयवंत बैकर, आतिष गायकवाड यांनी कारवाई केली.

यात 67100 रुपये किंमतीचे निळ्या रंगाचे 11 प्लास्टिकचे 200 लिटर क्षमतेचे ड्रम प्रत्येक ड्रममध्ये 200 लिटर प्रमाणे दारु तयार करण्याचे तांबड्या रंगाचा उग्र वास येत असलेला मिश्रीत द्रव्य,500 रुपये किंमतीचे 20 लिटर क्षमतेचा अॅल्युमिनिअमचा सतेला,15500 रुपये किंमतीचे एकूण 3 पत्र्याच्या दोनशे लिटर क्षमतेच्या टाक्या,दोन टाक्यांमध्ये 200 लिटर प्रमाणे एका टाकीमध्ये 100 लिटर प्रमाणे दारु तयार करण्याचे तांबड्या रंगाचा उग्र वास येत असलेला मिश्रीत द्रव्य,4020 रुपये किंमतीचा 20 लिटर क्षमतेचा सफेद रंगाचा कॅनला फिरकीचे बुच असलेला त्यामध्ये गावठी हातभट्टीची तयार दारु आढळून आली.

सदर प्रकरणी रसायनी पोलिस ठाण्यात म.प्रो.अॕक्ट 65 खंड (क)(इ)(फ)अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.