प्रभाग समिती सभापती संजय भोपी यांची आयुक्तांकडे मागणी
सिटी बेल लाइव्ह / पनवेल #
पनवेल महानगरपालिका क्षेत्राअंतर्गत कार्यरत असलेल्या सर्व कोव्हीड १९ रुग्णालय व केअर सेंटर येथील उपलब्ध बेडबाबतची अद्ययावत माहिती दररोज जाहीर करण्यात यावी अशा मागणीचे लेखी निवेदन पनवेल महानगरपालिका प्रभाग समिती ब चे सभापती संजय भोपी यांनी महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख यांना दिले आहे.
पनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये कोरोना बाधित रुग्णांवर उपचारासाठी असलेल्या रुग्णालय व केअर सेंटर येथील उपलब्ध बेडची अद्ययावत माहिती मिळत नसल्यामुळे कोरोनाचे निदान झाल्यानंतर संबंधित रुग्णास उपचारासाठी दाखल करताना रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांची दमछाक होत आहे. सोबतच रुग्णवाहिकेच्या अतिरिक्त खर्चाचा भार सहन करावा लागत आहे. हे सर्व टाळून कोरोना बाधित रुग्णांस तात्काळ उपचारार्थ दाखल करण्याची प्रक्रिया सुलभतेने पार पाडता यावी याकरिता उपलब्ध बेडबाबतची अद्ययावत माहिती दररोज जाहीर करणे आवश्यक असल्याचे भोपी यांनी म्हटले आहे.






Be First to Comment