ओढ
कसे लपवू सांग हृदयात तुजला
अजून भाळण्याची भीती वाटते
घायाळ जगाला करशील आता
तुझ्या लाजण्याची भीती वाटते।।
गुंतता हृदय हे चित्त बेभान झाले
तुझ्या आठवणींनी मन वेडावले
कुठे शोधू सांग तुझिया घराला
पता शोधण्याची भीती वाटते।।
किती डाव मांडून मोडले हातांनी
कितीदा नव्याने उभा राहिलो
नको वाटते ही सोपीच पैज आता
तुला हारण्याची भीती वाटते।।
किती विश्व भिजले पापण्यात आता
किती आठवणींनी छळले असे
कसे चांद तारे सांग निजतील आता
तुझ्या जागण्याची भीती वाटते
सोडून दे राणी रुसवा फुकाचा
मनविण्यास आलो दुरुनी असा
घेता मिठीत विरघळून जाईल
तुझ्या स्पर्शाची ओढ मनी दाटते।।
शेखर अंबेकर, आदई






Be First to Comment