रोहा बलात्कार प्रकरणी रायगड पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी :
बारा तासांत आरोपी जेरबंद
सिटी बेल लाइव्ह / नागोठणे (महेश पवार) :
रोहा तालुक्यातील तांबडी येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या करणार्या नराधमाला रोहा पोलिसांनी बारा तासांच्या तासात बेड्या ठोकल्या आहेत. पीडित मुलगी तिच्या आजोबांना शेतावरुन आणण्यासाठी निघाली होती.
रोहा तांबडी येथील पिडीत मुलीचे आजोबा हे रविवारी (दि. २६ जुलै) त्यांच्या ताम्हणशेत येथील शेतावर काम करत होते. सायंकाळी पावणेसहा वाजण्याच्या दरम्यान १४ वर्षांची नात दुचाकी घेऊन त्यांना आणण्यासाठी निघाली. मात्र रात्रीचे आठ वाजले तरी न परतल्याने तिच्या आई वडिलांनी शोधाशोध सुरु केली. मात्र सर्वत्र अंधार पसरल्यामुळे ती सापडली नाही. शेवटी ग्रामस्थांनी शोध घेण्यास सुरुवात केली, असता रात्री साडेनऊ वाजण्याच्यादरम्यान ताम्हणशेत बुद्रुक गावच्या रस्त्यावरील वावळ्यांचा कोंड या ओहळाच्या मध्यभागी एका दगडावर ती मृतावस्थेत आढळून आली.
तिच्यावर अतिप्रसंग करुन तिची हत्या करण्यात आली होती. पोरीला बघून तिच्या आई-वडिलांच्या पायाखालची जमीनच सरकली होती. ही माहिती सोमवारी (दि. २७ जुलै) रोह्यात पसरताच रोहेकरांमध्ये प्रंचड संताप झाला होता. घटनेनंतर पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, अपर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, रोह्याचे डिवायएसपी किरण सूर्यवंशी आणि रोहा पोलीस निरीक्षक बंडगर यांनी तपास सुरु केला.
पोलीस अधीक्षकांनी आठ पथके तयार केली होती. सर्च ऑपरेशन सुरु झाले आणि अवघ्या बारा तासांत त्या नराधमाच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले. त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का ? याचा तपास पोलीस करीत आहेत.






Be First to Comment