Press "Enter" to skip to content

कर्जत, खालापूर पोलीस ठाण्यात गाडी चोरीचे ७ गुन्हे उघडकीस

कर्जत पोलिसांची धडाकेबाज कारवाई मोटारसायकल चोरी करणाऱ्या आरोपीस ठोकल्या बेड्या

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |

कर्जत पोलीस ठाण्याच्या प्रवेशद्वार जवळ कर्जत पोलिसांनी केलेल्या नाकाबंदी मध्ये मोटारसायकल चोरी करणाऱ्या २ ठकांस पकडण्यात पोलिसांना यश आले आहे, कर्जत आणि खालापूर पोलीस ठाण्यात हद्दीत ७ मोटारसायकल चोरल्याचे कबूल केले आहे, अश्या मोटरसायकल चोरी करणाऱ्या २ आरोपीस पोलिसांनी मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे.

२७ सप्टेंबर २०२१ रोजी रायगड जिल्हा पोलिस दलाकडून ऑलआउट ऑपरेशन जाहीर केले होते, सदर ऑपरेशन मध्ये महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी करून मोटरसायकल चोरीचे गुन्हे उघड करण्याचे तसेच इतर कारवाई करण्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुबे यांचे आदेश झाले होते. त्याप्रमाणे कर्जत पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक सुवर्णा पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत पोलिस ठाणे हद्दीत श्रीरामपूर व चार फाटा येथे नाकाबंदी नेमून वाहनांची तपासणी करण्याचे आदेश दिले होते.

त्यावेळी श्रीरामपूर ते येथे नाकाबंदी करण्याकरिता नेमलेले पोलीस हवलदार जयवंत काठे, पोलीस शिपाई गणेश बोराडे, महिला पोलीस शिपाई मनाली शिंदे, पोलीस शिपाई अनुजित शिंदे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांची तपासणी करीत असताना मुरबाड बाजूकडून येणारी संशयित पल्सर मोटरसायकल त्यांनी अडवली सदर मोटरसायकलचा नंबर प्लेट ची पोलीस हवलदार काठे यांनी पाहणी केली असता ती (एम एच ४६ -वाय -५२२७) असल्याने सदरची मोटरसायकल ही त्यांच्याकडील तपासावर असलेल्या कर्जत पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर क्रमांक २५६/२०२१ भादवि कलम ३७९ मधील चोरीस गेलेली मोटरसायकल असल्याची पोलीस हवलदार जयवंत काठे यांची खात्री पटली.

त्यावेळी इतर पोलिसांच्या मदतीने सदर मोटारसायकल वरील दोन स्वार इसमांना ताब्यात घेऊन पोलिसांनी त्यांचे नाव गाव विचारले असता १) अनिकेत नंदकुमार जाधव (वय-२२) राहणार बौद्धवाडा कोषाणे तालुका कर्जत जिल्हा रायगड, २) आकाश गोविंद मोरे (२३ -वर्ष ) राहणार भीमनगर परळी तालुका सुधागड जिल्हा रायगड असे सांगितले.

त्या वेळी त्या दोघा इसमांना पोलीस ठाणे येथे आणून पोलिसांनी त्यांच्याकडे मिळून आलेली मोटरसायकल बाबत विचारपूस केली त्यावेळी ते दोघेही उडवाउडवीची उत्तरे देऊ लागली त्यावेळी सदर इसमास विश्वासात घेऊन चौकशी केली असता सदरची मोटरसायकल ही भिसेगाव खिंडी जवळील पेट्रोल पंपाजवळ चोरी केल्याचे सांगितले. पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेऊन कर्जत पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक सुवर्णा पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जत पोलीस ठाणे मधील पोलीस उपनिरीक्षक महेश धोंडे, पोलीस हवलदार जयवंत काठे, पोलीस हवालदार सुभाष पाटील, पोलीस हवालदार हर्षद जमदाडे, पोलीस शिपाई भूषण चौधरी, पोलीस शिपाई अश्रुबा बेंद्रे, पोलीस शिपाई मंदार माळवी यांनी त्यांच्याकडे अधिक तपास केला असता कर्जत पोलीस ठाणे हद्दीत ६ तर खालापूर पोलिस ठाणे हद्दीत १अश्या एकूण ७ मोटरसायकली चोरी केल्याचे तपासात कबूल केले. आरोपींनी चोरलेल्या ७ मोटारसायकली जप्त करण्यात कर्जत पोलिसांना यश आले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.