Press "Enter" to skip to content

रसायनी पोलिसांनी हरविलेल्या पाच वर्षीय दक्षला केले कुटुंबाच्या स्वाधीन

महीला पोलीस कर्मचाऱ्यांनी दाखवली समयसूचकता : हरवलेला चिमुकला परतला सुखरूप घरी

सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |

रसायनी परिसरातील वावेघर येथे मोलमजुरी करून जीवन जगणा-या नागरिकांची संख्या मोठी आहे.वावेघर व मोहोपाडा नाक्यावर सकाळी उभे राहून आपल्या कुटुंबाचा गाडा चालविण्यासाठी रोजंदारीवर काम करणारे वावेघर येथील दोघे पवार पती-पत्नी हे नेहमीप्रमाणे बुधवारी सकाळी घराबाहेर पडले.

याचवेळी त्यांचा पाच वर्षांचा चिमुकला दक्ष त्यांच्या मागोमाग घराबाहेर पडला.यावेळी घरात दक्षची आजी होती.परंतू दक्ष घराबाहेर पडल्याची आजीला काहीच कल्पना नव्हती.

दरम्यान रसायनी पोलिस ठाण्याच्या महिला पोलिस कर्मचारी एस.जी.खाडे ह्या पोलिस ठाण्याच्या दिशेने जात असताना त्यांना पराडे वळणावर लहान मुलगा रडत असताना दिसून आला.यावेळी महिला पोलिस खाडे यांनी चिमुकल्याला धीर देवून त्याला नाव विचारले.यावेळी चिमुकल्याने दक्ष पवार असे सांगितले.

याबाबत रसायनी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास दादाभाऊ डोंगरे यांना कळविले असता त्यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे त्या मुलाच्या नातेवाईकांना पोलिस हवालदार अमित कवले व महिला पोलिस एस.जी.खाडे यांनी वावेघर येथील पोलिस मित्र विष्णू चव्हाण यांच्याशी संपर्क करुन दक्षच्या कुटूंबियांचा तपास केला.व कुटूंबियांना बोलवून दक्षला त्याची अजी तंग्यामा अर्जुन पवार रा.वावेघर यांच्या ताब्यात दिले.आपला हरविलेला दक्ष सापडल्याने दक्षच्या कुटूंबियांनी रसायनी पोलिसांना धन्यवाद दिले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.