सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
मोहोपाडा येथील सार्वजनिक तलावात गेल्या काही वर्षांत बूडून मृत्यू होण्याचे प्रमाण वाढल्याचे दिसून येते.पानशिल येथील मयत राम बापू काठावले (वय 58) हे मोहोपाडा येथून नेहमीप्रमाणे चालत जात असताना मोहोपाडा तलावाजवळून जात असताना पाय घसरून पाण्यात पडून मयत झाले.
त्यांना काही दिवसांपासून अंधूक दिसत होते.मोहोपाडा तलावास कातळ ठिकाणी काठ नसल्याने पाय घसरून पाण्यात बुडून मयत झाल्याची फिर्याद देविदास दामोदर काठावले यांनी रसायनी पोलिस ठाण्यात दिली आहे. मयत राम बापू काठावले यांच्यावर चौक ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.
याप्रकरणी घटनास्थळी रसायनी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास दादाभाऊ डोंगरे,पोलिस उपनिरीक्षक धनाजी काळे यांनी घटनास्थळी भेट दिली.याबाबत रसायनी पोलिस ठाण्यात 34/2021प्रमाणे सी.आ.पी.सी 174 प्रमाणे नोंद झाली आहे.राम बापू काठावले यांचा बुडून मृत्यू झाल्याने पानशिळ गावात शोककळा पसरली आहे.







Be First to Comment