Press "Enter" to skip to content

कर्जत मध्ये गांजा विकणारे दोघे पोलिसांच्या ताब्यात

3 लाख 29 हजार 600 रुपयांचा गांजा कर्जत पोलिसांच्या ताब्यात

सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |

कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील छोटे वेणगाव येथे राहणारे पती- पत्नी यांच्या राहत्या घरी पोलिसांना छापा टाकला असता त्यांना सुमारे 3 लाख 29 हजार 600 रुपयांचा गांजा जप्त केला आहे.

याबाबत कर्जत पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार कर्जत तालुक्यातील छोटे वेणगाव येथे राहणारा गणपत भागा वाडेकर व त्याची पत्नी उज्वला गणपत वाडेकर हे गांजा या अंमली पदार्थांची मोठ्या प्रमाणात विक्री करीत असून त्यांनी मोठ्या प्रमाणात गांजा हा अंमली पदार्थ विक्री करण्याकरता त्यांच्या राहत्या घरी आणला असल्याची गोपनीय माहिती कर्जत पोलिस ठाण्याला मिळाली.

त्याप्रमाणे कर्जत पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी खालापूर संजय शुक्ला यांना सविस्तर माहिती दिली, त्यांनी पोलिस निरीक्षक सुवर्णा पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.

कर्जत पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक सुवर्ण पत्की, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू अल्लाट, पोलीस हवालदार सुभाष पाटील, महिला पोलीस नाईक दिपक खडे, पोलीस शिपाई भूषण चौधरी, पोलीस शिपाई गणेश पाटील, पोलीस शिपाई अश्रुबा बेंद्रे यांनी 05:15 वा च्या सुमारास कर्जत तालुक्यातील मौजे छोटे वेणेगाव येथे राहणारा गणपत वाडेकर याच्या राहत्या घरी छापा टाकला.

याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू आल्हाट आणि त्याची टीम अधिक तपास करीत असताना गणपत वाडेकर व त्याची पत्नी हे संगमनेर येथून मुख्तार शेख याच्याकडून हा गांजा आणत असत, कर्जत पोलिसांचे पथक हे संगमनेर येथे मुख्तार शेख याच्या घरी गेले मात्र तो घरी नसल्याचे आढळून आले आहे, फरार शेख याचा पोलीस तपास करीत आहेत.

गणपत वाडेकर व त्याची पत्नी उज्वला वाडेकर यांच्या ताब्यात असलेला 3 लाख 29 हजार 600/- रुपये किंमतीचा 20 किलो 600 ग्रॅम गांजा हा अंमली पदार्थ त्यांच्या ताबे कब्जामघ्ये आढळून आला. त्यांच्यावर कर्जत पोलीस ठाण्यात गु. र. क्र.255/2021 एन. डी. पी. एस कायदा 1985 चे कलम 8 (कलम)20,29 अन्वये दि.23 सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्यातील तीन लाख 29 हजार 600 रुपये किमतीचा 20 किलो 600 ग्रॅम वजनाचा गांजा व गुन्हा करताना वापरलेली 40 हजार रुपये किमतीची चार चाकी वाहन असा पोलिसांनी 3 लाख 69 हजार रुपये किमतीची चा मुद्देमाल जप्त केला आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.