सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष जाधव यांची धडाकेबाज कामगिरी
सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम |
कोलाड पोलीस ठाण्याचे कार्यतत्पर व कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष जाधव यांच्या पथकाने धडाकेबाज कामगिरी केली असून कल्याण मटका जुगार खेळ खेळविणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत कोलाड पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहिती अशी की, पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार कोलाड पोलिसांनी मौजे वरसगाव गावच्या हद्दीत पद्मावती नगर तलाठी ऑफिस लगतच्या वळणावर डांबरी रोडवर आरोपी संदेश जाधव वय २४ वर्षे रा. सिद्धाई अपार्टमेंट रोहा मूळ गाव माणगाव हा वरील तारखेच्या वेळी या ठिकाणी स्वतःच्या फायद्याकरता लोकांकडून पैसे घेऊन कल्याण नावाचा मटका जुगार हारजितीचा खेळ खेळविताना आढळून आला सदर इसमाकडू शंभर चिट्ठयांचा बंच प्रत्येक चिठ्ठीवर लिहिलेले कल्याण असे मजकूर आढळून आले.
सदर इसमावर कोलाड पोलीस ठाण्यात पोस्टेगुरं नं ००७८/२०२१जुगार अधिनियम१८६७ कलम१२ अ प्रमाणे कोलाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पो. ना. एस. ए. विघ्ने व कोलाड पोलीस पथक करीत असून सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष जाधव यांचे व कोलाड पोलिसांचे या धडाकेबाज कामगिरी बद्दल कोलाड परिसरातून कौतुक केले जात आहे.







Be First to Comment