रायगड जिल्हा बुद्धिबळ संघटना आणि व्ही जी पाटील एज्युकेशनल फाऊंडेशन व रोटरी क्लब ऑफ रसायनी पाताळगंगा यांच्यावतीने बुद्धीबळ स्पर्धा
सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
कोरोना महामारीच्या जीवघेण्या, युद्धजन्य परिस्थितीच्या दिड वर्षांनंतर आपल्या सर्वांच्यात पुन्हा एकदा आत्मविश्वास निर्माण करता यावा यासाठीचा एक भाग म्हणून,रायगड जिल्हात प्रथमच अलिबागमधील खिडकी ,येथे सामाजिक कार्यकर्ते, माजी मुख्याध्यापक,समाजप्रिय व्यक्तीमत्व स्व. व्ही.जी.पाटिल सर यांच्या स्मृतिदिनानिमित्त, राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती चे औचित्य साधून ” खुल्या बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन ” करण्यात आले आहे.
ही स्पर्धा एकाच खुल्या गटात साखळी पद्धतीने खेळविण्यात येणार आहे. यासाठी सर्व स्पर्धकांनी आपली नावनोंदणी 30 सप्टेंबर अगोदर नोंद करावी. हि स्पर्धा ग्रामपंचायत खिडकीचे स्व.वासुदेव गणेश पाटील बहुउद्देशीय सभागृह, खिडकी ( तिनवीरा स्टॉप वरून खाली कींवा पोलिस चेक नाका, पेझारी येथून एमआयडीसी रोड वरून पुढे ), तालुका- अलिबाग येथे असून स्पर्धा रॅपिड पद्धतीने (25 मिनिटे प्रत्येकी) खेळविण्यात येईल.
यासाठी २ ऑक्टोंबर, शनिवार, सकाळी 10 वाजता प्रवेश फी रूपये ५० मात्र, प्रवेश फी गुगल पे ने दर्शन पाटील 9923952732 आणि श्रेयस पाटील 9420728564 यांच्याकडे जमा करावी,आणि आपले नाव, ठिकाण, जन्मतारीख, मोबाईल व्हॉट्सअँप नंबर, व्हॉट्सअँप किंवा एसएमएसने विलास म्हात्रे – अलिबाग
8888011411 ,गोपीनाथ डंगर – अलिबाग
9850015440
चंद्रशेखर पाटील – पनवेल 9326504179, संदीप पाटील – उरण 9920351983, किशोर देशपांडे -गोरेगाव 8888250234
अंकित जोशी ,कर्जत 8087440936 यांच्याकडे द्यावेत असे आवाहन रसायनी पाताळगंगा रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष आल्हाद पाटील यांनी केले आहे.
या स्पर्धेतील सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येतील.तसेच यशस्वी स्पर्धकांना प्रथम क्रमांक रू.1500 , द्वितीय रू. 1000 तृतीय रू. 700,चतुर्थ रू. 500 ,पंचम रू. 400 सहावा रू. 300,सातवा ते दहावा रू. 200 प्रमाणे देण्यात येतील. तर पहिल्या पाच स्पर्धकांना ट्रॉफी देण्यात येईल .







Be First to Comment