Press "Enter" to skip to content

कळंबोलीत शिवसेनेने पाडले राष्ट्रवादी काँग्रेसला भले मोठे खिंडार

आबासाहेब लकडे यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश : राष्ट्रवादी काँग्रेस ला केला राम राम

सिटी बेल | खारघर |

राष्ट्रवादी काँग्रेस चे पनवेल जिल्हा उपाध्यक्ष आबासाहेब रामचंद्र लकडे यांनी शिवसेनेत आज. दिनांक २८ सप्टेंबर रोजी जाहीर प्रवेश केला.संसद रत्न खासदार श्रीरंग बारणे यांनी त्यांचे शिवसेनेत स्वागत केले.आबासाहेब लकडे यांच्या समवेत त्यांच्या असंख्य समर्थकांनी शिवसेनेत प्रवेश केला.

रायगड जिल्हा प्रमुख शिरीष घरत यांच्या नेतृत्वाखाली आणि पनवेल महानगर प्रमुख रामदास शेवाळे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेनेची संघटनात्मक ताकत दिवसेंदिवस वाढत आहे.संघटना मजबूत करण्याच्या इराद्याने शिवसेना नेते आणि शिवसैनिक अथक परिश्रम घेत आहेत.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यंक्सच्या नेतृत्वात राज्य सुस्थितीत येत असल्याचे पाहून अनेकांचा ओघ शिवसेनेकडे वाढला आहे.आबासाहेब लकडे यांच्या सारखे पॉवरफुल नेतृत्व शिवसेनेत आल्याने कळंबोली विभागात शिवसेनेचे पारडे जड झाले आहे.पश्चिम महाराष्ट्रातील जनतेचे लकडे प्रथम पसंतीचे नेते मानले जातात.

आबासाहेब लकडे यांच्या सह त्यांच्या समर्थकांनी केलेल्या पक्ष प्रवेशाचे श्रेय शिवसेनेचे पनवेल विधानसभा क्षेत्र समन्वयक प्रदिप ठाकूर यांना जाते.खासदार श्रीरंग बारणे यांनी आबासाहेब लकडे यांच्यासह पक्ष प्रवेश करणाऱ्या तमाम कार्यकर्त्यांच्या हातावर शिवबंधन बांधले तसेच बाबासाहेब लकडे यांच्या हाती शिवसेनेचा भगवा ध्वज स्वाधीन केला.

आपल्या भाषणात खासदार बारणे म्हणाले की, मुख्यमंत्री तथा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारने कोरोना कालखंडात अत्यंत सजग कामगिरी बजावली. केंद्र सरकारकडून अपेक्षित मदत प्राप्त झाली नाही तरीदेखील कोरोनाविषाणू च्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत रुग्णांना आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चोख नियोजन केले. त्यानंतर आलेल्या दोन चक्रीवादळात आणि महापुरात त्यांनी आपत्तीग्रस्तांना तातडीने मदत पोहोचली तसेच त्यांच्या पुनर्वसनासाठी ठोस कार्यक्रम देखील राबविला. त्यांच्याप्रमाणेच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हेदेखील अत्यंत प्रभावीपणे काम करत आहेत. पनवेल परिसरात असणारी अपुऱ्या पिण्याच्या पाणीपुरवठ्याची समस्या असो किंवा दुहेरी मालमत्ता कराचा संवेदनशील विषय असो या दोन्ही विषयांच्यात एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून सकारात्मक निर्णय घेण्याचे काम महाविकासआघाडी करणार आहे. आमच्या याच कामाचा धडाका यामुळे कार्यकर्ते प्रेरित होऊन शिवसेनेत प्रवेश करत आहेत. शिवसेनेत ज्या पद्धतीने कार्यकर्त्यांचा ओघ सुरू आहे ते पाहता येणाऱ्या कालखंडात पनवेल महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकेल हे मी खात्रीने सांगतो.

या कार्यक्रमाला खासदार श्रीरंग बारणे, रायगड जिल्हा प्रमुख शिरीष घरत,पनवेल महानगर प्रमुख रामदास शेवाळे, उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील,पनवेल विधानसभा मतदार संघ समन्वयक प्रदिप ठाकूर, पनवेल संपर्क प्रमुख योगेश तांडेल, गुरुनाथ पाटील, दीपक घरत, पद्माकर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.