Press "Enter" to skip to content

कोलाड सुतारवाडी महामार्गावर भयंकर अपघात : सर्वत्र हाहाकार

भरधाव ट्रेलरची दुचाकीस्वाराला धडक : दुचाकीस्वार जागीच ठार, चालक फरार

सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम |

मुबंई गोवा महामार्गाला जोडला गेलेला कोलाड सुतारवाडी महामार्गावर अत्यन्त धक्कादायक आणि दुर्दैवी घटना घडली असून भरधाव ट्रेलरने एका दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिल्याने यात दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना सुतारवाडी येथील ढोकलेवाडी नजीक घडली आहे. मालवाहू ट्रक ट्रेलर चा चालक फरार झाला आहे. या घटनेमुळे सर्वत्र हाहाकार मजला आहे .

या अपघाताबाबत कोलाड पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोलाड कडून सुतारवाडीकडे भरधाव जाणारा ट्रेलर क्रमांक एम एच ०४८ए जी ५३७० तर सुतारवाडी कडून येणारी दुचाकी वाहन क्रमांक एम एच ०६ ए व्ही २५३९ चालक मंगेश प्रकाश हिलम रा. निळज माणगाव वय (२०) सुतारवाडी कडून कोलाडच्या दिशेने येत असतांना ढोकळेवाडी येथील वळणावर ट्रेलर चालकाने दुचाकीस्वार मंगेश हिलम यांच्या दुचाकीला थेट जोरदार धडक दिली. या दुर्घटनेत मंगेश हिलम यांचा दुर्दैवी अंत झाला. मालवाहू ट्रेलर चालक हा पसार झाला असल्याने या बाबत एकच संतप्त व्यक्त केला जात आहे .

सदरच्या घटनेची माहिती मिळताच कोलाड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुभाष जाधव यांनी आपल्या सहकाऱ्यांसमवेत घटनास्थळी धाव घेत घटनेची पाहणी केली असून कोलाड पोस्टे गुरनं ००७७/२०२१ भा द वी कलम ३०४ए २७९ ,३३७,३३८,मोटार वाहन अधिनियम १९८८,१८४,१३४ प्रमाणे या घटनेची नोंद केली असून पोलीस निरीक्षक सुभाष जाधव यांच्या मार्गदर्शखाली पोहवा जे एस चेरकर व एस आर माने अधिक तपास करत आहेत .

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.