विनायक लोखंडेचा आकस्मित मृत्यू सर्वांच्या जिवाला चटका लावून जाणारा
सिटी बेल लाइव्ह / गोवे-कोलाड (विश्वास निकम )
रोहा तालुक्यातील मौजे किल्ला येथील सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले गजानन तुकाराम लोखंडे यांचा एकुलता एक मुलगा विनायक याचा आकस्मित मृत्यू सर्वांच्याच जीवाला चटका लावून जाणारा. त्याचा अचानक मृत्यू झाल्याने सर्वांनाच धक्का बसला असून लोखंडे कुटूंबावर दुःखाचे डोंगर तर किल्ला गावासह विभागात शोककळा पसरली आहे.
कुशल कर्तबगार मेहनती शांत मनमिळाऊ आणि सर्वच कामात हिरहीरीने पुढाकार घेणारा उच्चशिक्षित तरुण होतकरु असा विनायक उर्फ लाडका ” भाई ” वय वर्ष ३८ याचा अचानक 23 जुलै रोजी मध्यरात्री हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाल्याने नेहमी सर्वांचीच मने जिंकणारा भाई अचानकपणे आपल्यातून निघून गेल्याने किल्ला गावासह परिसरातील साऱ्यांचेच अश्रू अनावर झाले असून दुःखमय शोककळा पसरले आहे.
सामाजिक शैक्षणिक क्रीडा क्षेत्रात युवकांना नेहमी प्रोत्साहित करणारा भाई यांचे निधन २३ जुलै रोजी झाले.व अंत्यसंस्कार किल्ला येथील वैकुंठ धाम येथे करण्यात आले यावेळी कोरोना पार्श्वभूमीवर येथील नागरिकांनी अतिदक्षता बाळगत हे अंत्यसंस्कार करण्यात तसेच यावेळी त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो यासाठी सर्वांनी श्रद्धांजली अर्पण केली.त्यांच्या पश्चात पत्नी,मुलं,आई,वडील, पुतणे,चुलते,बहीण,भाचे व मोठा लोखंडे परिवार असून त्यांचे पुढील दशक्रिया विधी शनिवार ता.१ ऑगस्ट रोजी श्री तीर्थक्षेत्र वाकेश्वर किल्ला या ठिकाणी होत असून त्याचे उत्तरकार्य(अकरावे ) रविवार २ऑगस्ट रोजी राहत्या घरी मौजे किल्ला या ठिकाणी होणार असल्याची माहिती त्यांच्या कुटूंबियांकडून प्राप्त झाली आहे.






Be First to Comment