कावऴा
सृष्टीतील एक जीव हा आगळा
काळा काळा , नाव त्याचे कावळा
कर्ण कर्कश आवाजही वेगळा
कुणी येण्याची वर्दी देतो सकळा..
चोच मारून करतो कितीएक घायाळ,
मात्र सवयीने करी स्वच्छतेचा प्रतिपाळ
अशा प्रकारे करतो पर्यावरणाचा सांभाळ
असा हा नावडता ;,पण उपयुक्त कावळा
या कावळ्यांची भरते तारेवरती शाळा
पितृपक्षात यांच्यासाठी आमंत्रण माळा
पितरांना सद्गती देण्यासाठी होती गोळा
यासाठी हा एकाक्ष पक्षी तोच तो …..कावळा ।।
वर्षा मेहेंदर्गे, नवीन पनवेल






Be First to Comment