शरद पवारांना प्रभू श्रीरामांची महती सांगणारी पाठविली 1000 पत्रे
सिटी बेल लाइव्ह / कळंबोली / प्रतिनिधी #
प्रभू रामचंद्रांचे मदिर उभारून कोरोना आटोक्यात येणार आहे का? असे वादग्रस्त विधान नुकतेच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले होते. त्यांना प्रभू श्रीरामांचे स्मरण करून देणारी 1000 पत्रे महाराष्ट्र युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व रायगड जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष मयुरेश नेतकर यांच्या नेतृत्वाखाली आज कळंबोली भाजपा युवा मोर्चा तर्फे पाठविण्यात आली.
या अभियनावेळी कळंबोली पोस्ट आँफिस येथे भाजपा रायगड जिल्हा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष अमर ठाकूर, जमीर शेख, कळंबोली भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष गोविंद झा, श्रीकांत ठाकूर, गौरव नाईक, अझर शेख, दीपेश परब, निशान गिल, जोबान सिंग व इतर युवा मोर्चा पदाधिकारी उपस्थित होते.
देशाचे आराध्य दैवत असलेल्या प्रभू रामचंद्रां विषयी कोणी नकारात्मक बोलत असेल तर प्रभू रामांची महती सांगण्याचे काम भारतीय जनता युवा मोर्चा करत राहणार. जमीर शेख






Be First to Comment