Press "Enter" to skip to content

जिल्हास्तरीय ट्रेडिशनल बेल्ट /मास रेसलिंग स्पर्धेमध्ये गोशीन रियूच्या विद्यार्थ्यांचे राज्यस्तरावर निवड

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे |

अलिबाग मधील कर्णिक हॉल मध्ये 10 वी जिल्हास्तरीय ट्रेडिशनल बेल्ट /मास रेसलिंग स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये पाणदिवे (उरण )व केळवणे(पनवेल )क्लासच्या मुलांनी घवघवीत यश मिळविले व त्यांची निवड शिर्डी येथे होणाऱ्या राज्य स्तरीय स्पर्धेसाठी झाली आहे .

अनिश पाटील गोल्डमेडल, मंथन म्हात्रे गोल्डमेडल, रोहित घरत दोन गोल्डमेडल, श्लोक ठाकूर ब्रॉन्झ मेडल, योग म्हात्रे एक गोल्ड व एक सिल्व्हर मेडल, श्रेया म्हात्रे गोल्डमेडल, अमिषा घरत गोल्डमेडल, यश पाटील गोल्ड मेडल, गायत्री म्हात्रे गोल्डमेडल, आयुष पाटील गोल्डमेडल, अमिता घरत गोल्ड मेडल,अमर घरत गोल्ड मेडल,समीक्षा पाटील गोल्डमेडल,सेजल पाटील गोल्ड मेडल पटकाविले .

या स्पर्धेचे अध्यक्ष संतोष कवळे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस इन्स्पेक्टर जिया चव्हाण रायगड पोलीस उपस्थित होत्या. संतोष मोकल, रोहन गुरव,राकेश म्हात्रे व गोपाळ म्हात्रे उपाध्यक्ष यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.विजेत्या सर्व स्पर्धेकांचे कौतुक होत आहे. विविध स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

More from क्रिडाविश्वMore posts in क्रिडाविश्व »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.