सिटी बेल लाइव्ह / उरण(घन:श्याम कडू)
उरणमध्ये कोरोना पॉझिटीव्हचा आकडा वाढतानाच दिसत आहे. आज दिवसभरात १८ जण पॉझिटीव्ह आढळले आहेत. तर २ कोरोना पॉझिटीव्हचा मृत्यू झाला आहे. उपचार करून ५ जणांना घरी सोडण्यात आले.
उरण १, मोठे भोम १, नवापाडा करंजा ३, शिवम अपार्टमेंट करंजा रोड १, भेंडखळ १, बोरघार १, धुतुम १, राघोबा देव १, रांजणपाडा जासई १, सोनारी १, मोरा कोळीवाडा १, फुंडे १, डोंगरी २, जांभुळपाडा १, श्रीराज नगर १ असे एकूण १८ जण पॉझिटीव्ह सापडले आहेत. खोपटे १, नागाव १, गणेश नगर करंजा २, भेंडखळ १ असे ५ जणांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. तर टाईप २-११४ बोकडविरा १, करंजा १ असे २ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
एकूण ८०५, बरे झालेले ६१०, उपचार घेणारे १७१ तर मयत २४ असल्याची माहिती तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.उरणमध्ये कोरोना पॉझिटीव्हचा आकडा कमी होण्याऐवजी वाढतानाच दिसत आहे. त्यामुळे उरणच्या जनतेत भीतीचे वातावरण पसरले आहे.






Be First to Comment