Press "Enter" to skip to content

ए.पी.एम टर्मिनल कंपनी तर्फे उरण तालुक्यातील नवघर येथे लसीकरण

सिटी बेल | उरण | विठ्ठल ममताबादे |

मु.नवघर ता.उरण जिल्हा रायगड येथे ए.पी.एम टर्मिनल कंपनी नवघर यांच्या वतीने कोवीड-१९ प्रतिबंधक कोविशिल्ड लसीचे नवघर व नवघर परिसरातील नागरिकांना पालवी हाॅस्पीटल उरण यांच्या मार्फत शेखर प्रकाश तांडेल नवघर यांच्या कार्यालयात मोफत देण्यात आले.

यावेळी ए.पी.एम टर्मिनल कंपनीचे मॅनेजर योगेश ठाकुर व पालवी हाॅस्पीटल उरणचे सुरेश पाटील आणि त्यांची टीम तसेच नवघर गावातील ए.पी.एम.टर्मिनलचे कर्मचारी राजेश श्रीराम पाटील, जयप्रकाश नारायण पाटील,धमेंद्र भालचंद्र तांडेल,कु.प्रितम कृष्णा बंडा,विनोद सदानंद बंडा,दिनेश वसंत बंडा,अनिल महादेव पाटील, चंद्रलाल पुरूषोतम तांडेल,वैभव मधुकर भोईर,अमित जोशी,कु.हार्दिक हसुराम भोईर,कु.रोशन सदानंद भोईर इत्यादी तरूणांनी योग्य प्रकारे नियोजन करून ३५० नागरिकांना पहिला व दुसरा लसीचा डोस देण्यास सहकार्य केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.