विरह
आज वाटे माझ्या मनी
आभाळ आले भरूनी
भाव दाटले मनीचे
लोचने ही पाणावली
जलदाचे मेघ कसे
बरसावे अंगणी
आसवांचा बांध फुटूनी
ओघळावे गालावरी
झालेली खोल जखम
पुनरपी जागावी
बांध घातला तरी
पुन्हा हुळहुळावी
पक्षिणी विरहाने
कशी व्याकुळ व्हावी
ह्रदयाची तगमग तशी
पुन्हा पुन्हा जागावी
आज उदासीन वारा
ना हलवी पानेफुले
जणू मनाचे प्रतिबिंब
मज त्यात ही दिसे
मनाला कसे आवरू
हे ना कळाले
पुन्हापुन्हा आठवणीत
मन हे गुतवावे
नयना पेंढारकर, नवीन पनवेल






Be First to Comment