खालापूर पोलीसांनी बलात्काराची खोटी तक्रार देणाऱ्या महीलेला ठोकल्या बेड्या : महीलेसह पाच जण गजाआड
सिटी बेल | रसायनी | राकेश खराडे |
बलात्कार झाल्याचा आरोप करून फिर्याद दाखल करणारी महिलाच आरोपी निघाल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी खालापूर पोलिसांनी पाच जणांच्या टोळीला अटक केली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा खालापूर पोलिसांची दमदार कारवाईची झलक खालापूर तालुक्याला बघण्यास मिळाली.
दि.५/६/२०२१ रोजी एका मुलीने खालापूर पोलीस ठाण्यात येऊन आपल्यावर बलात्कार झाल्याचे सांगून माझे विवस्त्र फोटो त्यांच्या मोबाईल मध्ये काढले असल्याची फिर्याद दिली. खालापूर पोलीस ठाणे गुन्हा रजी.१३३/२०२१ भा द वि स कलम ३७६(ड)३५४(अ)५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्यातील आरोपी महालिंग शिवलिंग जंगम व राजाराम बबन गोगावले यांना पोलिसांनी पुणे येथून ताब्यात घेतले.
त्यांच्याकडे विचारपूस केल्यावर आम्ही मुलीला ओळखत नसून कधीही पाहिले नाही असे सांगून आमचे व्यावसायिक व आर्थिक व्यवहाराचे वाद दिलीप यादव व त्याचे सहकारी यांच्यासोबत असून तसा पुणे पोलिसांकडे त्यांच्याविरोधात गुन्हा नोंद होऊन त्यांना अटकही झाली होती. या गोष्टीचा राग धरून त्याने आमच्या विरोधात खोटा बनाव तयार केल्याचे सांगितले.
गुन्हा एक वर्ष तीन महिने पूर्वीचा होता . हाती ठोस पुरावा नाही, तपासात मोठी क्लिष्टता होती.रायगड पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांच्या सूचनेनुसार तांत्रिक विष्श्लेषण सुरू केले. फिर्यादी मुलीच्या गरिबी व आर्थिक परिस्थितीचा फायदा घेऊन तिच्याकडून खोटे कारस्थान करण्यास भाग पाडल्याचे समजले.त्यामुळेच तिने अशी फिर्याद दिली,ती अशी दि.१९ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी २०२० या दरम्यान नोकरीचे आमिष दाखवून स्वतःच्या सोन्याच्या दुकानात नोकरी देतो असे सांगून खालापूर येथे दुकान पहाण्यासाठी बोलावले,पण आरोपीने त्याचे कार मध्ये बसवून गाडी हायवेच्या दिशेने नेऊन एकटी व अंधाराचा फायदा घेऊन अंगावर व खांद्यावर हात घालून केसांशी खेळून तुला काम करण्याची अजिबात गरज नाही, तुला भरपूर पैसा देईन मला शरीरसंबंध ठेवण्यास दे असे सांगून माझ्या शरीराशी चाळे करण्यास सुरुवात केली.मी विरोध केला, पण एकटी होते त्यातच बंदुकीचा धाक दाखवला, मला दम देऊन शांत बसण्यासाठी सांगितले. अंधाराचा फायदा घेऊन गाडी सुनसान झाडीमध्ये उभी केलीज्ञव फिर्यादिवर बळजबरी करू लागले. कपडे काढण्यास विरोध केला असता दोघांनी माझे कपडे काढले व संगनमत करून आळीपाळीने जबरदस्ती बलात्कार केला.
त्यावेळी आरोपींनी माझे विवस्त्र फोटो त्यांच्या मोबाईलमध्ये काढले.कुणाला काही सांगितल्यास हे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. असा बनाव करून खालापूर पोलिसांना माहिती दिली, व गुन्हा दाखल केला. ही फिर्याद दाखल होत असताना खालापूर पोलिसांना काहीतरी गडबड दिसत होती.
खालापूरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांच्या नजरेतून ही बाब सुटली नाही,त्यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू झाला.दिलेल्या माहितीमध्ये तफावत जाणवत होती, अधिक तपास करत असताना खालापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय शुक्ला, पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या चार तुकड्या करून दोन तुकड्या पुण्याकडे जाण्यासाठी सपोनि. कराड,पोह. कांबळे,सावंत,कराळे दुसरी तुकडी सपोनि. शेखर लव्हे,पोह.खंडागळे,गुरव,खराडे तर कल्याणकडे सपोउनि.बजरंग राजपूत,पोना. शिरतार, शहाणे,पवार व मुंबई तुकडी महिला सपोनि. श्रीमती काळे,पोह.पाटील,व्हसकोटी, म्हात्रे या तुकड्या तयार करून रात्रीत तीन ठिकाणी सापळा रचून दिलीप साहेबराव यादव वय ४६ रा. मोरदरी हवेली पुणे,सुमित प्रकाश सापते वय ३० रा. गौडदरा पुणे,बंटी उर्फ श्रीकांत गोंधळी वय ४० कल्याण ठाणे,वैभव वसंत गिरकर वय ३४ परेल मुंबई व दोन महिला यांचा यात समावेश असून एक महिला आरोपी फरारी आहे.
न्यायालयाने पाच जणांना पाच दिवसाची पोलीस कस्टडी दिली आहे.खोट्या बनाव केलेल्या गुन्ह्याची उकल केल्याने पुन्हा एकदा खालापूर पोलीस यांच्या दमदार कामगिरीवर खालापूरकर खुश आहेत.







Be First to Comment