
सिटी बेल लाइव्ह / अलिबाग / राजेश बाष्टे #
” संत निरंकारी सत्संग भवन” मानी,अलिबाग येथे “विशेष रक्तदान शिबिर (कोव्हिड 19 निमित्त )” अलिबाग ब्रँच मार्फत व संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने आणि ‘सद्गुरू माता सुदिक्षाजी महाराज ‘यांच्या कृपा आशिर्वादाने, अतिशय सुंदर रित्या सम्पन्न झाले .या मध्ये 65 रक्तदात्यांनी रक्तदान केले .यासाठी जिल्हा रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. दिपक गोसावी व अलिबाग रक्तपेढीची टीम यांनी खुप सुंदर योगदान दिले .तसेच अलिबाग ब्रँचचे मुखी व संयोजक विजय आहेर आणि रायगड क्षेत्राचे क्षेत्रीय संचालक प्रवीण पाटील यांचे खूप सुंदर मार्गदर्शन लाभले .तसेच अलिबाग सेवादल यु. नं.1473 च्या सर्व सेवादल बंधु-भगिनी व बालसेवादल यांनी सेवादल संचालक जगदिश कोळी,सेवादल शिक्षक नितीन पाटील,महिला सेवादल ईंचार्ज सौ.कोमल पाटील या सेवादल अधिकारांच्या मार्गदर्शनाखाली सुंदर योगदान दिले.या कार्यक्रमामध्ये कुठल्याही प्रकारची भाषणे वगैरे न होता “सद्गुरू माता सुदीक्षा सविंदर हरदेवजी महाराज “यांनी दिलेले “निरंकार प्रभू ”परमात्माचे स्मरण करून लगेच सुरू करण्यात आला. शिबीरामध्ये भाग घेणाऱ्या सर्व सेवादल बंधु भगिनींनी मास्क, ग्लोव्हज्, सँनिटायझरचा वापर करून आणि सोशल डिस्टंसींग चे भान ठेवून ह्या कार्यक्रमामध्ये अत्यंत हिरीरीने भाग घेतला.
कोरोना कोविड-१९ या विषाणूची भिती पाहता सोशल डिस्टसिंग ,मास्क, सँनिटायझर इ.कोरोना कोविड-१९ विषाणूची काळजी घेऊन मंडळाने रक्तदात्यांसाठीही व्यवस्था केली होती. जिल्हा रुग्णालय अलिबाग रायगड रक्तपेढीतर्फे
डॉ. दिपक गोसावी ,तसेच रक्तपेढीतील कुणाल साळवी(पी आर ओ),रक्तपेढी तंत्रज्ञ हेमकांत सोनार, सौ.पुनम पाटील,प्रज्ञा पवार(अधिपरिचारिका),
संकेत घरत आदिंनी रक्तसंकलन केले. रक्तदान शिबीर यशस्वी झाल्यामुळे संयोजक विजय आहेर यांनी सर्वाचे आभार मानले.






Be First to Comment