सिटी बेल | गोवे-कोलाड | विश्वास निकम |
सुनिल तटकरे युवा प्रतिष्ठान आणि रिलायन्स इंडस्ट्रियल नागोठणे यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 24 सप्टेंबर 2021 रोजी कोविड-१९ चे ८००डोस येरळ ग्रामपंचायत,जामगाव ग्रामपंचायत आणि कुडली ग्रामपंचायत आदी तीन ग्रामपंचायतींना मिळून देण्यात येणार असल्याची माहिती सुनिल तटकरे युवा प्रतिष्ठान चे अध्यक्ष अनिकेत भाई तटकरे यांनी दिली.
खासदार सुनिल तटकरे, रायगडच्या पालकमंत्री अदितीताई तटकरे, आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्या आदेशानुसार आणि मार्गदर्शनाखाली सदरील कोविड-१९ हे दोन डोस देण्यात येणार असल्याचे सुनिल तटकरे युवा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते श्री राकेश शिंदे यांनी सांगितले. यासाठी राकेश शिंदे आणि त्यांचे सहकारी जामगाव, येरळ, कुडली ग्रामपंचायतींना प्रत्यक्ष भेटी देऊन डोस देण्या बाबत योग्य ते मार्गदर्शन करत आहेत.
गेल्या वर्षी कोरोनाने अनेकांचे मृत्यू झाले. अनेकांना आजारी ठेवले. मात्र कोरोनावर मात करण्यासाठी डोस उपलब्ध झाल्यानंतर ते जास्तीत जास्त नागरिकांना कसे मिळतील आणि त्यांचे आरोग्य कसे सुधारेल याकडे खासदार सुनिल तटकरे, पालकमंत्री आदितीताई तटकरे आणि आमदार अनिकेत भाई तटकरे यांनी विशेष प्रयत्न केले.
त्यामुळे ग्रामीण तसेच शहरी भागातील अनेक नागरिकांना कोविड-१९ चा पहिला व दुसरा डोस घेण्याची संधी मिळाली. याचाच एक भाग म्हणून येथील तीन ग्रामपंचायतींना ८०० डोस देण्यात येणार आहेत. या डोसांचा त्या त्या परिसरातील नागरिकांना आवश्यक लाभ घेण्याचे आवाहन आमदार अनिकेत तटकरे यांनी केले आहे.
Be First to Comment