सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
कर्जत तालुक्यातील कडाव येथील गणेगाव चिंचवली येथील श्री सद्गुरू आनंद प्रेम आश्रमाच्या गो शाळेमधून 3 गावठी जातीच्या गाईंची चोरी झाली आहे, तीन गायींची किंमत 35 हजार रुपये आहे.
कर्जत तालुक्यात गुरे चोरणारी टोळी कार्यरत आहे, ही टोळी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन गुरांना बेशुदीचे इंजेक्शन देऊन गुरे बेशुद्ध करतात बेशुद्ध झालेली गुरे काही क्षणांत आपल्या वाहनात भरून पळ काढतात. अश्या घटना ब-याच वेळा घडल्या आहेत, मात्र आता या टोळीची मजल वाढली आहे ते आता बंदिस्त असलेली गुरे पळवण्यात माहीर झाले आहेत.
कर्जत तालुक्यातील कडाव येथील गणेगाव चिंचवली येथे श्री सद्गुरू अनंत प्रेम आश्रम आहे या आश्रमात गोशाळा आहे, अज्ञात चोरट्यांनी आश्रमाच्या कंपाऊंडच्या तार तोडून आत मध्ये प्रवेश करून गो शाळेतील 35 हजार रुपये किंमतीच्या तीन गावठी जातीच्या गायी 22 सप्टेंबर 2021 रोजी ते दि. 23 सप्टेंबर 2021 रोजी 19:00 वा च्या दरम्यान पळवून नेल्या आहेत.
याबाबत कर्जत पोलीस ठाणे येथे गु.र.नं.254/2021 भा.दं.वि.क 380 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस नाईक शेळके हे करीत आहेत.







Be First to Comment