नगरसेवक सतिश पाटील यांच्या नेतृत्वाखाली केला प्रवेश

सिटी बेल लाइव्ह / कळंबोली / विकास पाटील #
राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस – सेना- राष्ट्रीय काँग्रेस महाआघाडीचे सरकार आल्यानंतर राज्यातील जनतेला आपले सरकार आल्याचा आनंद होत असून पनवेल मधील समस्या सोडविण्यासाठी नगरसेवक व राष्ट्रवादी काँग्रेसचे पनवेल महानगरपालिका जिल्हा अध्यक्ष सतिश पाटील प्रयत्नशिल आहेत. आज पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून वावंजा जिल्हा परिषद मतदार संघातील शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला.
राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव तथा पनवेल प्रभारी संदीप दादा म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाने पनवेल युथ विधानसभा अध्यक्ष सुनील ढेंबरे, युवा कार्याध्यक्ष मंगेश नेरुळकर, विधानसभा उपाध्यक्ष अनुराग गायकवाड, युवा सचिव प्रभाकर फडके, विधानसभा सहसचिव विकास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली व एमआयडीसी तळोजा कार्याध्यक्ष अनिल ढोंगरे, एमआयडीसी तळोजा उपाध्यक्ष आशीर्वाद पाटील, वावंजे विभाग अध्यक्ष बजरंग म्हात्रे यांच्या उपस्थितीत पनवेल शहर जिल्हा व पनवेल ग्रामीणच्या बहुसंख्य युवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. त्यांचे जिल्हा अध्यक्ष व नगरसेवक सतिश पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेश सचिव तथा पनवेल प्रभारी संदीप म्हात्रे, सुनील ढेंबरे, यांनी स्वागत केले. आपण ज्या विश्र्वासाने पक्षात प्रवेश केलात त्याला तडा जावू देणार नाही असे सतिश पाटील यांनी सांगितले






Be First to Comment