सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
चाकू दाखवून खिशातील रोख रक्कम, पॅनकार्ड एटीएम कार्ड असा ऐवज बळजबरी चोरी करणाऱ्या चोराच्या कर्जत पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.
कर्जत पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 20 सप्टेंबर 2021 रोजी 04:40 वा च्या सुमारास आरोपी रा. कांतीनगर भिसेगाव ता.कर्जत याने फिर्यादी रा.ठोंबरे किराणा दुकानाजवळ भिसेगाव ता.कर्जत हे नोकरीवर जात असताना मौजे कर्जत रेल्वे स्टेशनच्या टिकीट घराजवळ भिसेगाव येथील एम.एस.ई.बी ऑफीससमोर आल्यावर फिर्यादीस भिती दाखविण्याच्या उद्देशाने चाकु सारखे हत्यार दाखवुन भोसकुन ठार मारण्याची धमकी देवून शिवीगाळी करुन फिर्यादीचे रोख रक्कम व पॅनकार्ड,ए.टी.एम कार्ड असा माल जबरीने चोरुन नेला आहे.
सदर गुन्ह्यातील आरोपीस दिनांक 21 सप्टेंबर 2021 रोजी 03:19 वा च्या सुमारास अटक करण्यात आली आहे.
याबाबत कर्जत पोलीस पोलीस ठाणे येथे गु.र.नं.251/2021 भा.दं.वि.क.392,504,506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू आल्हाट हे करीत आहेत.







Be First to Comment