Press "Enter" to skip to content

कोंडगाव ग्रामपंचायत हद्दितील आदीवासी बांधवांना लसीकरण

सिटी बेल | नागोठणे | महेश पवार |

जिल्ह्यातील आदिवासी बांधवांमध्ये कोरोना प्रतिबंधक लस घेण्यास काहीशी उदासीनता दिसून येत आहे. असे असतांनाच नागोठण्याजवळील कोंडगाव (ता.रोहा) ग्रामपंचायत हद्दितील आदिवासी वाड्यांमधील आदिवासी बांधवांना लसीकरण करण्याची महत्वाची कामगिरी कोंडगाव ग्रामपंचायतीने नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सहकार्याने केली आहे.

कोंडगाव ग्रामपंचायतीच्या वतीने कोंडगाव येथील राजिप प्राथमिक शाळेच्या इमारतीत गुरुवार दि. २३ सप्टेंबर रोजी नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत कोंडगाव ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासी बांधवांसाठी कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिम राबविण्यात आली. यामध्ये १२५ आदिवासी बांधवाचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात आले. यावेळी कोंडगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच कमल बुरूमकर, उपसरपंच अनंत वाघ, माजी सरपंच तथा विद्यमान सदस्य निखिल मढवी, ग्रामसेविका विद्या घरत, नागोठणे आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डाॅ. श्रुती मोरे, आरोग्य सेवक वंदन तांबोली, जगदीश मोरे, रुग्णवाहिका चालक आल्हाद पिंगळे, निलिमा जाधव, जगदीश मोरे, आशासेविका चित्रा मढवी, प्रीती बुरूमकर आदींसह ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्राने व केंद्रांतर्गत असलेल्या सर्व सात उपकेंद्रांनी नागोठणे विभाग तसेच आजूबाजूच्या परिसरात कोविड प्रतिबंधक लसीकरणात लक्षणीय कामगिरी केली आहे. त्यामुळे विभागातील नागरिकांमध्ये समाधानी वातावरण निर्माण झाले असून प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी व कर्मचारी यांना नागरिक धन्यवाद देत आहेत.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.