सिटी बेल | कर्जत | संजय गायकवाड |
कर्जत पोलीस ठाण्याच्या हद्दीत बोगस इंन्टाग्राम अंकाउंट उघडुन महिलेची बदनामी करणाऱ्या अज्ञात व्यक्तीच्या विरुद्ध कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस त्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेत आहेत.
कर्जत पोलीस ठाणे हद्दीत दिनांक 18 सप्टेंबर 2021 रोजी 07:42 वा च्या सुमारास कोणीतरी अज्ञात व्यक्तीने तो इसम अथवा अज्ञात व्यक्ती महिला फिर्यादी या नसतांना वाईट हेतुने फिर्यादी यांचे नाव फोटो असलेले इंन्टाग्राम अंकाउंट अशी फिर्यादी यांची खाजगी माहीती इंस्टाग्राम या सोशल साईटवर देवुन त्याव्दारे फिर्यादी यांच्या नावाचे बोगस इंन्टाग्राम अंकाउंट उघडुन त्या अंकाउंटवर जाणीवपुर्वक प्रोफाईल फोटो म्हणुन फिर्यादी याचा फोटो ठेवुन त्या अंकाउंट वरुन फिर्यादी याचे मोहिली गावातील महिला साक्षीदार हिच्याशी फिर्यादी यांना मुल होत नाही म्हणुन अश्लिल चॅटिंग करुन फिर्यादी यांची बदनामी केली.
याबाबत कर्जत पोलीस ठाणे येथे गु.र.नं.252/2021 भा.दं.वि.क.500 माहिती तंत्रज्ञान अधिनियम,2000 (2008 चे सुधारणेसह) 66 C प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की करीत आहेत.







Be First to Comment